Home
Home चंद्रपूर तुकूम येथे भीषण अपघात, आमदार किशोर जोरगेवार यांची घटनास्थळी पाहणी;

तुकूम येथे भीषण अपघात, आमदार किशोर जोरगेवार यांची घटनास्थळी पाहणी;

0
94
                             चंद्रपूर

                   हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर.(का प्र ) :- हायवा चालकाला फिट आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहनाने रस्त्याकडेला असलेल्या नागरिकांना चिरडले. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून काही नागरिक जखमी झाले आहेत. सानिका कुमरे (वय २२ वर्षेरा. लक्कडकोट) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना तुकूम येथे घडली असूनआमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काजल आश्राम हिची आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेतली.

मिळालेल्या माहितीनुसारसायंकाळी पाच वाजताच्या सुमारास हायवा चालक तुकूम परिसरातून जात असतानाचालकाला फिटचा झटका आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनाने रस्त्यालगत उभ्या असलेल्या नागरिकांना आणि ऑटोला चिरडले. या घटनेत सानिकाचा जागीच मृत्यू झालातर इतर नागरिक जखमी झाले आहेत. यात नंदा उंबरकर (वय ५५रा. मेजर गेट,) या किरकोड जखमी झाल्या आहेत. तसेच काजल आश्राम (रा. उपरवाहीता. राजुरा) हिला जास्त इजा झाल्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांची उपस्थिती होती. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या काजल मेश्राम हिची भेट घेतली आणि सुरु असलेल्या उपचाराबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. मृतक आणि जखमी या दोघीही मैत्रीनी असुन त्या पोलिस भरतीच्या तयारी करिता चंद्रपूरात राहत हांत्या. त्या एका खाजगी अभ्यासिकेत अभ्यास करुन घरी जात असतांना सदर घटना घडली आहे.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                        *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here