Home
Home चंद्रपूर अखिल विश्व गायत्री परिवार तर्फे १४ जून ला भंडारा येथे भव्य रक्तदान...

अखिल विश्व गायत्री परिवार तर्फे १४ जून ला भंडारा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

0
70

भंडारा

                     हॅलो चांदा न्युज

भंडारा.(का प्र) :- अखिल विश्व गायत्री परिवार, युवा प्रकोष्ठ भंडारा, महाराष्ट्र सकल धोबी समाज आरक्षण न्यायिक समिती भंडारा, नंदगोपाल फाऊंडेशन व जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी, इंडियन रेड क्रॉस सोसायटी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दि.१४ जून २०२५ सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत गायत्री शक्तीपीठ, समता नगर, मेंढा रोड भंडारा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत रक्तपेढ्यांमध्ये नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवत असतो. त्यात मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण होत असते. परिणामी अपघातग्रस्त, गरोदरमाता, शस्त्रक्रियेतील रुग्ण यांच्यासाठी रक्त उपलब्ध करण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जास्तीत -जास्त तरूण, जागृत नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत समाजासाठी पुढाकार घेऊन रक्तदान करावे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्यामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन अखिल विश्व गायत्री परिवार, युवा प्रकोष्ठचे चेतन भैरम, सौरभ दिवटे, महाराष्ट्र सकल धोबी समाज आरक्षण न्यायिक समितीचे जिल्हाध्यक्ष विलास केजरकर, नंदगोपाल फाऊंडेशनचे संस्थापक उपाध्यक्ष डॉ. यशवंत लांजेवार, रेडक्रॉस चे जिल्हा कोषाध्यक्ष डॉ. हेमंत चंदवासकर यांनी केले आहे.   

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                      *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*सहसंपादक:- राजेश मेश्राम*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here