Home
Home चंद्रपूर नंदगोपाल च्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करून केला जागतिक पर्यावरण दिन साजरा.

नंदगोपाल च्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करून केला जागतिक पर्यावरण दिन साजरा.

0
147

                                भंडारा

                          हॅलो चांदा न्युज

भंडारा.(का प्र) :- मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक प्रवाहच विस्कळीत होत असून प्रजातींचा पृथ्वीवरून नष्ट होण्याचा वेग वाढला आहे. काही वनस्पतींच्या प्रजाती पृथ्वीवरून नामशेष झाल्या आहेत. तसेच प्राणी प्रजाती नष्ट झाल्या असून प्रजाती सध्या धोकादायक स्थिती आहे. म्हणून त्यावर मात करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन नंदगोपाल फाऊंडेशनचे संस्थापक उपाध्यक्ष डॉ. यशवंत लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणवादी तथा सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर यांच्या नेतृत्वात मनिषा भांडारकर, शितला माता मंदिर देवस्थान समितीचे कार्याध्यक्ष धनराज धुर्वे, सुंदरलाल मेघवानी, ओमप्रकाश लांजेवार, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, रवीशंकर साकोरे, राजेश मडामे व नंदगोपाल फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिंदू – मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या शितला माता मंदिर देवस्थानच्या परिसरात विविध प्रजातींच्या रोपट्याचे वृक्षारोपण करून त्यांच्या संरक्षणासाठी लोखंडी कटघरे लावण्यात आले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भु -मातेच्या रक्षणासाठी वृक्षारोपण करून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी विधायक कार्य स्वत:पासून सुरू करण्याची गरज आहे.असे विचार नंदगोपाल फाऊंडेशनचे सदस्य विलास केजरकर यांनी व्यक्त केले.संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली जाते. या वृक्षांची वाढ सुकर व्हावी तसेच त्यांचे संगोपन व्यवस्थित व्हावे व शहरवासीयात स्वच्छ भंडारा व ग्रीन भंडारा, सुंदर- पर्यावरण विषयक जागृती होण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. यासाठी श्री गणेशा कडे साकडे घालण्यात आले. पर्यावरण रक्षणासाठी स्थानिक पातळीवर हातभार लावणे ही प्रत्येकांसाठी अभिमानाची बाब आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सदैव प्रयत्नशील राहून तळमळीने वृक्षसंवर्धनाचे कार्य करणे आवश्यक आहे. कारण हे कार्य खरोखर सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ज्याठिकाणी झाडे आहेत. त्याठिकाणचे तापमान कमी असते. प्रत्येकांनी आपल्या वाढदिवस किंवा चांगल्या कामानिमित्त वृक्षारोपण बरोबरच त्याचे संवर्धन सुध्दा करावे. असे शितला माता मंदिर देवस्थान समितीचे कार्याध्यक्ष धनराज धुर्वे यांनी केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुंदरलाल मेघवानी व प्रास्ताविक रविशंकर साकोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार भोजराज गौतम यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नंदगोपाल फाऊंडेशनचे ओमप्रकाश लांजेवार, दिनेश हरडे, सर्विन भोयर, भावेश बावनकुळे, दिनेश नखाते, मनोज लांजेवार, धनराज देशकर, अप्पन शेख, अनुबाई इत्यादींनी सहकार्य केले.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                      *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*सहसंपादक:- राजेश मेश्राम*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here