वरोरा
हॅलो चांदा न्युज
वरोरा.(का प्र) :- श्री संत गजानन महाराज भक्त परिवार वरोराच्यावतीने ८ जून रोज रविवारला श्री संत गजानन गाथा अमृतकन कार्यक्रमाचे आयोजन सकाळी दहा वाजता वानखेडे सेलिब्रेशन येथे करण्यात आले आहे
श्री संत गजानन महाराज भक्त परिवार वरोराच्यावतीने वरोरा शहरात दरवर्षी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री ची उपासना होत असते यावर्षी श्री संत गजानन महाराज बावन्नीचे रचयीते मुंबई येथील प्राध्यापक सुरेश ग शेवडे यांचा अमृतकनश्री संत गजानन गाथा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे प्राध्यापक शेवडे धर्मभूषण भारताचार्य व्याख्यान प्रवचन रत्नआदर्श शिक्षक पुरस्कार आदर्श कीर्तनकार ईत्यादि पुरस्काराने विभूषित आहे प्राध्यापक शेवडे यांनी देश विदेशात अनेक व्याख्याने दिले आहेत अमेरिकेमध्ये ५५० कार्यक्रम त्यांनी केले आहेतश्री संत गजानन महाराज शेगाव येथे सलग 28 वर्ष बारा दिवसाचे प्रवचन प्राध्यापक शेवाळे यांनी केले आहेअशा थोर विभूतीच्या रसाळ व अधिकार वाणीतून श्री च्या गाथेचे अमृत आपणास मिळणार आहे या कार्यक्रमास विदर्भातील अनेक गजानन भक्त उपस्थित रहाणार आहेत
आठ जून रोजी सकाळी सात वाजता पादुका अभिषेक व पूजन तसेच उल्हासनगरचे बाळकृष्ण कुळसंगे आपले अनुभव कथन करणार आहे
कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त जनतेने लाभ घ्यावा असे आव्हान श्री संत गजानन महाराज भक्त परिवार वरोरा यांनी केले आहे.
























