नेपाल ,भारत ,बांगलादेश, भूटान व श्रीलंका इत्यादि देशांचा सहभाग
समुद्रपुर
हॅलो चांदा न्युज
समुद्रपुर.(का प्र) : – नेपाल काठमांडु येथील दशरथ रंगशाला खेलकुद परिषद इंडोअर स्टेडियम येथे 25 मे 2025 ते 27 में 2025 ला नेपाल शोतोकान कराटे एसोसिएशन द्वारा 16 वी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जापान चे ग्रैंडमास्टर सिहान शीना काटसुतोस यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूना पदक देवून सन्मानित करण्यात आले.
या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत आयोजक सदर स्पर्धेत विद्या विकास स्पोर्टिंग क्लब समुद्रपुरच्या खेळाडूंनी टी एस आर के के ओ इंडिया संघटनेच्या माध्यमातून 8 खेळाडूंनी प्रवेश नोंदविला होता.
या स्पर्धेत काता व कुमिते या खेळ प्रकारात वय व विविध वजन गटात खेळाडूनी उत्कृष्ट खेळी करीत 11 पदके पटकविली या मधे वरिष्ठ महिला -55 किलो वजन गटात धनश्री विजय धोटे सुवर्ण पदक व कांस्य पदक, जूनियर वयोगटात समीर देवतले सुवर्ण पदक, कनक महाकाले रजत पदक व कांस्य पदक, अथर्व झाड़े रजत पदक, रिधा पठान कांस्य पदक, सानिया संजय उरकुड़े कांस्य पदक, अनुष्का खडसे दोन कांस्य पदक, आदर्श बावनकुले कांस्य पदक 2 सुवर्ण पदक , 2 रजत पदक, व 7 कांस्य पदक पटकवून वर्धा जिल्याचे नाव ऊंच केले.
संघ व्यवस्थाकपक प्रशिक्षक सिहान क्रिष्णा यांच्या मार्गदर्शनात खेळाडू कराटे खेळाचे प्रशिक्षण घेत आहे, सोनाली भोंगाडे यानी पंचाचे कार्य केले,
या सर्व खेळाडूंना विद्या विकास महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ उमेशजी तुळस्कर प्राचार्य डॉ. चंद्रकिशोर रेवतकर , उप प्राचार्या डॉ नयना शिरभाते मैडम, तालुका क्रिड़ा सयोजक प्रा. चंद्रकांतजी सातपुते, प्रा.मेघश्यामजी ढ़ाकरे ,ऑल कराटे स्पोर्ट असोसिएशन वर्धा जिल्हा तालुका अध्यक्ष तथा तालुका क्रीडा सह संयोजक सिहान राजु कांबळे, टी एस आर के के ऑर्गनाईझेशन चे अध्यक्ष सिहान शेख दस्तगीर, सेंसाई पराग पाटिल, सेंसाही हिमांशु बडवाने या सर्वांनी शुभेच्छा दिल्या,
खेळाडूंनी या यशाचे श्रेय कराटे प्रशिक्षक सिहान क्रिष्णा ढोबळे व आई वडिलांना दिल्या.
























