Home
Home चंद्रपूर *चंद्रपूर शहरात 8 हजार 359 गणेश मूर्तीचे विसर्जन*

*चंद्रपूर शहरात 8 हजार 359 गणेश मूर्तीचे विसर्जन*

0
113

चंद्रपूर – गेल्या १० दिवसांपासून मोठय़ा भक्ति भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला . मोठ्या १० ९ मूर्तीसह विसर्जनाच्या दिवसापर्यंत एकूण ८३५ ९ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले . चंद्रपूर शहर महानगरपालिका , पोलीस विभाग , जिल्हा प्रशासन यांच्या योग्य नियोजनाद्वारे सोहळा पार पडला . पहाट होण्यापूर्वीच शहरातील मुख्य रस्त्यांची सफाई करण्यात आली .
विसर्जनाच्या दिवशी चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने बाहेर पडत लाडक्या बाप्पाला उत्साहाने निरोप दिला . याप्रसंगी गणेश विसर्जनाच्या मुख्य स्थळांकडे जाणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते . अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करून चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारा लहान मूर्तीचे विसर्जन करण्यात आले . प्रशासनातर्फे जटपूरा गेट वरून बाप्पांवर पुष्पवृष्टी करून सर्व गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकींचे स्वागत करण्यात येत होते .
शहर नियंत्रण समिती अंतर्गत मनपाचे १५० अधिकारी कर्मचारी सोहळ्यासाठी कार्यरत होते . पोलीस विभागास सीसीटीव्ही उपलब्ध करून दिल्याने त्यांची नियंत्रण कक्षाद्वारे मिरवणुकीवर नजर होती . आपत्ती व्यवस्थापन चमु पुर्ण वेळ तैनात राहणार असुन मोठे सर्च लाईट , फायर अँड रेस्क्यु व्हेइकल , पावर बोट , लाईफजॅकेट लाईफ सेव्हींग ट्युब्ज , क्रेनची व्यवस्था करण्यात आल्याने कुठेही अनुचित घटना घडली नाही . ईरई नदी काठावर विसर्जनासाठी ६ घाट उभारण्यात आल्याने कुठेही गर्दी झाली नाही . गणेश विसर्जन मिरवणुक दुपारी ४ नंतर गांधी चौकातून सुरु झाली .
याप्रसंगी चंद्रपूरकर गणरायाचा नामघोष , मंत्रोच्चार , ढोल ताशांच्या गजर आणि श्रीं च्या विसर्जन मिरवणुकीच्या रथाची आकर्षक सजावट करून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देत होते . यावेळेस विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव , रेन वॉटर हार्वेस्टींग , पर्यावरण रक्षण , वृक्ष लागवड , प्रदूषण नियंत्रण याबाबत आकर्षक देखाव्याद्वारे जनजागृती केली . गणपतीचे आगमन विसर्जन मार्गावर गणपती बाप्पा मोरयाचा गजर ऐकण्यास मिळत होता . गणपतीचे दर्शन घेण्याकरिता भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाली . Chandrapur municipal corporation गणेश विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याने स्वच्छतेकरिता महानगरपालिका सफाई कर्मचारी सकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत निरंतर कार्यरत होते . यासाठी विभागातर्फे त्यांना काम ३ शिफ्ट मधे वाटून देण्यात आले होते . मिरवणुकीदरम्यान स्वच्छता कर्मचारी शक्य तितक्या तत्परतेने मिरवणुकी पाठोपाठच झालेला कचरा गोळा करत होते . शहर स्वच्छ राखण्याकरिता मनपातर्फे मिरवणूक मार्गांवर कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात आली होती . अनेक ठिकाणी रिकाम्या कागदी प्लेट्सचा कचरा रस्त्याला घट्ट चिपकून असल्याने ब्लिचिंग पावडरद्वारे स्वच्छता करण्यात आली . अथक प्रयत्न करून मिरवणुकीदरम्यान वाहतुकीने अस्वच्छ झालेले रस्ते सकाळी ६ वाजेच्या आत साफ करून चकचकीत करण्यात आले .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here