चंद्रपूर : गणेश मिरवणुकीत लाठीचार्ज ; गणेशभक्तांचे ठिय्या आंदोलन , चौकशीचे आदेश.

0
43

चंद्रपूर : गणेश मिरवणुकीत लाठीचार्ज ; गणेशभक्तांचे ठिय्या आंदोलन , चौकशीचे आदेश चंद्रपूर शहरातील गणेश विसर्जनादरम्यान पोलिसांनी गणेश भक्तांवर लाठीचार्ज केल्याने जटपुरा युवक गणेश मंडळाचे अध्यक्ष दीपक बेले आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले . त्यामुळे रात्रीच्या सुमारास वातावरण बिघडले होते . दरम्यान या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यास निलंबित करुन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक – यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे .
9 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी चंद्रपूर शहरातील सर्वांनी गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली . दुपारी तीन वाजेपासून ही मिरवणूक निघाली . रात्री उशिरापर्यंत ती सुरु होती . पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामध्ये श्री गणेश विसर्जन सोहळा सुरू होता . मात्र , जयंत टॉकीज चौकामध्ये चंद्रपूरच्या गणेश राजा गणेश मंडळ आणि पोलिसांमध्ये वाद झाला . त्यामुळे त्यावेळी वातावरण बिघडले . पोलिसांनी गणेश भक्तांवर लाठीचार्ज केला . त्यामुळे संतापलेल्या चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष दीपक बेले आणि कार्यकर्त्यांनी जटपुरा गेट परिसरामध्ये ठिय्या आंदोलन केले . जोपर्यंत पोलिसांवर कारवाई होणार नाही , तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरुच ठेवू अशी भूमिका घेतल्याने वातावरण चिघडण्याची स्थिती निर्माण झाली होती . जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन सर्व गणेश भक्तांना शांतता राखण्याचे आवाहन केले . परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी पोलीस कर्मचारी आदेश रामटेक याला निलंबित केले . घडलेल्या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली . दरम्यान झालेला प्रकार हा कॅमेरा देखील असेल , त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येणार आहेत . जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या विनंतीला मान देत दीपक बेले यांनी आंदोलन समाप्त करत त्यानंतर मिरवणूक पुढे नेऊन गणेश मूर्तीचे विसर्जन केले .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here