स्वागत मंचावरून आमदार किशोर जोरगेवार यांनी केले गणेश मंडळाचे स्वागत

0
35

गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी गांधी चौक येथील यंग चांदा ब्रिगेडच्या स्वागत मंचावरून गणेश भक्तांसह गणेश मंडळांचे स्वागत केले.

यावेळी कल्याणी जोरगेवार, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, अजय जयसवाल, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहराध्यक्ष राशेद हुसेन, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार, अॅड राम मेंढे, अॅड परमहंस यादव, चंद्रशेखर देशमुख, आशा देशमुख, सायली येरणे, सविता दंडारे, सुजाता बल्ली, आशु फुलझेले, नीलिमा वनकर, आदींची उपस्थिती होती.

10 दिवसांच्या मुक्कामा नंतर आज गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. यावेळी निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत गणरायाला निरोप देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदा ही नागरिक व गणेश मंडळांच्या स्वागतासाठी गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत मंच उभारण्यात आला होता. गणेश मंडळ स्वागत मांच्याजवळ पोहचताच आमदार किशोर जोरगेवार यांनी गणेश मंडळांचे स्वागत केले. राज्यावर कोसळलेले नैसर्गिक विघ्न दूर करून राज्याला संपन्नतेचे आणि भरभराटीचे दिवस येवोत अशी कामना बाप्पाला अखेरचा निरोप देतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here