Home
Home चंद्रपूर मोहरम निमित्त जिल्हा कारागृह परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने शरबत वाटप.

मोहरम निमित्त जिल्हा कारागृह परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने शरबत वाटप.

0
81
                         चंद्रपूर
                   हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर.(का प्र) :- कारागृहातील हजरत मखदूम उर्फ गैबीशाह वली दर्ग्यावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शरबत वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शरबत वाटप स्थळी भेट दिली.यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश देवतळे, तुषार सोम, बलराम डोडाणी, अजय जयस्वाल, आशिष माशिरकर, रमजान अली घायल, राशिद हुसेन, सय्यद चाँद, राझीक खान, बशीर शेख, अबरार सय्यद, रमीझ हुसेन, शाहरूख मिरदा, शहबाज हुसेन, अतिकुल रहमान आदींची उपस्थिती होती.

हजरत हुसेन (र.अ.) हे इस्लाम धर्माचे प्रवर्तक हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू होते. मोहरमच्या दिवशी ते शहीद झाले होते. त्यामुळे या दिवसाची आठवण म्हणून मोहरमच्या नवमी आणि दहाव्या दिवशी चंद्रपूर कारागृहातील हजरत मखदूम उर्फ गैबीशाह वली यांचा दर्गा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येतो. यंदाही या दिवशी कारागृहातील दार खुले करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या भाविकांची सेवा म्हणून येथे आलेल्या हजारो भाविकांना शरबत वाटप करण्यात आले.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here