Home
Home चंद्रपूर कुरेशी समाजबांधवाचे जिल्हास्तरीय संमेलन उत्साहात संपन्न..!..कुरेशी व्यापाऱ्यांचे जनावरे खरेदी विक्री बंद आंदोलनाने...

कुरेशी समाजबांधवाचे जिल्हास्तरीय संमेलन उत्साहात संपन्न..!..कुरेशी व्यापाऱ्यांचे जनावरे खरेदी विक्री बंद आंदोलनाने शेतकरी झाले चिंताग्रस्त आठवडी बाजारात शुकशुकाट !

0
89
                           
                          चंद्रपूर
                    हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर : अखिल भारतीय जमीयतुल कुरेश बहुउद्देशीय संस्था चंद्रपूरच्या वतीने कुरेशी समाजबांधवांचे जिल्हास्तरीय संमेलन साहिल लॉन, चंद्रपूर येथे उत्साहात पार पडले. सदर संमेलन ्कुरेशी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अब्दुल रज्जाक कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. स्वागत अध्यक्ष करीम कुरेशी, साबीर कुरेशी, वसीम कुरेशी प्रामुख्याने मंचावरउपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार सय्यद रमजान अली, जाकिर कुरेशी, ॲड.वसीम कुरेशी, डॉ.आसिफ कुरेशी, अमान अहमद, हाजी तारीक, मोहम्मद सलीम कुरेशी, मौलाना रजा, नसीमभाई, सज्जू, मौलावा मजीद, मौलाना फारूख इमरान कुरेशी आदीसह इतर मान्यवर ही मंचावर उपस्थित होते.

या जिल्हास्तरीय संमेलनात कुरेशी समाजबांधवांवर होणारे अन्याय तथा त्यांना येत असलेल्या विविध अडचणीवर चर्चा करण्यात आली. कुरेशी समाजाला पशुधन व्यापारांमध्ये विविध समस्यांचा सामना करावा लागत असून त्यामुळे भितीचे वातावरण असते.देशभरात जवळपास एक कोटीहून अधिक कुरेशी बांधव असून यातील बहुतांश लोक शिक्षण घेवून नोकरी करीत आहे.तर इतर बांधव शेती व पशुधनाचा व्यापार करून उदरनिर्वाह करीत आहे. महाराष्ट्रात शेतीसाठी पशुधनाची खरेदी विक्री होत असते. सदर व्यापाऱ्यात अधिक शिथिलता आणण्यासाठी पशुधनाच्या खरेदी -विक्रीमध्ये परवाना जारी करून कुरेशी समाजबांधवांना सन्मानजनक जीवन प्रदान करण्यात यावे,असे मान्यवरांनी मत व्यकत केले. ॲड. वसीम कुरेशी म्हणाले की, जनावरांच्या वाहतुकीमध्ये सर्व दस्तावेज असताना वाहन जप्त केले जात असल्याचे मत व्यकत केले.

या संमेलनात डॉ.आसिफ कुरेशी नागपूर, ॲड.वसीम कुरेशी, जाकीर कुरेशी बुलढाणा सय्यद रमजान अली, यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन शाकिर कुरेशी, मौलाना फारख यांनी केले. या संमेलनात अन्सार कुरेशी, शहजाद कुरेशी, शहानुर कुरेशी, अबू कुरेशी, साजिद कुरेशी, नबी कुरेशी, आसिफ कुरेशी सह चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रमुख प्रतिनिधी व समाज बांधवांची उपस्थिती होती तसेच गडचिरोली, नागपूर, यवतमाळ जिल्हयातील मोठ्या प्रमाणात कुरेशी समाजबांधव ही या कार्यक्रमात उपस्थित होते.

कुरेशी व्यापाऱ्यांचे जनावरे खरेदी विक्री बंद आंदोलनाने शेतकरी झाले चिंताग्रस्त आठवडी बाजारात शुकशुकाट दिसून येत आहे , हे मात्र विशेष!

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                        *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here