Home Breaking News राजेश कुडे व इतरांवर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्याचा रस्ता अटकाव केल्याने गुन्हा दाखल!
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर(का.प्र.): दिनांक 30/09/2025 रोजी वेळ 17/20 दरम्यान राजकुमार कँटरर्स जुनोना रोड समोर पोलीस घटनास्थली पोहोचले असता मो.सा. क्र. MH34H8705 , महिद्रा थार क्र. MH34CJ1455, व बस क्र MH40N9430 यांची धडक झाल्याने मोटारसायकल क्रमांक MH34H8705 चा चालक नामे राकेश गौतम तैलंग वय 35 वर्ष रा. वित्तुबाब मंदिर जवळ, बाबुपेठ चंद्रपुर हा मयत अवस्थेत घटनास्थळी पडुन होता.
त्यामुळे पोलीस स्टाँप मिळुन सदर मयत उचलण्याकरिता गेले असता राजेश शंकर कुडे वय 33 वर्ष रा जुनोना चौक चंद्रपुर व इत्तर 3 लोकांनी मयताला उचलण्यास नकार दिला. व जुनोना ते चंद्रपुर कडुन येणाऱ्या जाणाऱ्या गाड्याचा रस्ता अटकाव करुन रस्ता जाम केला त्यांना पोलिसांनी समजविण्याचा प्रयत्न केला असता ते ऐकण्यास तयार नव्हते त्यामुळे त्यांना पोलीस स्टाँपच्या मदतीने रस्त्याच्या बाजुला केले व रहदारी सुरळीत केली. परंतु
राजेश शंकर कुडे व त्यांच्या सोबतचे इतर काही न ऐकता सदर ठिकाणी वातावरण चिघळवण्याचा व रस्ता अडविण्याचा प्रयत्न करीत असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली.अशी माहिती सूत्रांद्वारे मिळाली असून राजेश शंकर कुडे वय 33 वर्ष रा.जुनोना चौक चंद्रपुर व इत्तर 3 लोकांनी जुनोना ते चंद्रपुर कडुन येणाऱ्या जाणाऱ्या गाड्याचा रस्ता अटकाव करुन रस्ता जाम केल्य़ाने त्याच्या विरुध्द कलम 126(2) भारतीय न्याय संहिता अन्वये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन रामनगर येथे फोनव्दारे माहीती मिळाली की जुनोना रोड येथे एक अपघात झालेला आहे. पोलिस माहिती मिळताच घटनास्थळी रवाना झाले असता घटनास्थळावर
राजेश शंकर कुडे वय 33 वर्ष रा जुनोना चौक चंद्रपुर व इत्तर 3 लोकांनी मयताला उचलण्यास नकार दिला.अशी ही माहिती मिळाली.
तसेच विशेष सूत्रांनुसार मिळालेल्या माहिती प्रमाणे पोलिस स्टेशन रामनगर येथे गुन्हे क्र. 792/2025 कलम 126(2) भारतीय न्याय संहिता प्रमाणे राजेश कुडे व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*