Home
Home चंद्रपूर अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या हस्ते संविधान दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे...

अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या हस्ते संविधान दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे उद्घाटन!.

0
128

HELLO CHANDA NEWS

         चंद्रपूर(का. प्र.): डॉ.बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समीती चंद्रपुर, समता सैनिक दल, भारतीय बौध्द महासभा रिपब्लीकन पक्षाचे संयुक्त विद्यमाने व श्रीमती निर्मला नगराळे, अध्यक्षा तथा महादेव कांबळे, कार्याध्यक्ष, तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समीती चंद्रपुर यांचे नेतृत्वात तथा श्री प्रवीण उर्फ बाळू खोब्रागडे यांचे मुख्य संयोजनात ७६ व्या भारतीय संविधान सन्मान दिना प्रित्यर्थ पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा मेन रोड चंद्रपूर येथे अनेक कार्यक्रम घेण्यात आले.

        दिनांक २६.११.२०२५ रोजी आयोजित संविधान सन्मान दिन मिरवणुकीचे उद्घाटन चंद्रपूर अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे , यांच्या हस्ते मुख्य संयोजक बाळू उर्फ प्रवीण खोब्रागडे , बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष देशक खोब्रागडे, जिल्हा शांतता समिती सदस्य सय्यद रमजान अली, हाजी सय्यद अनवर अली, राजस खोब्रागडे, पुरणसिंग, सह डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समीती चंद्रपुरचे अनेक पदाधिकारी यांचे उपस्थितीत करण्यात आले.

   तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळ्‌याला अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपस्थित मान्यवरांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सामूहिक राष्ट्रगीत चे गायन व संविधान उद्देशिकेचे वाचन करून सामूहिक शपथ घेण्यात आली व दुपारी १४.३० वाजता संविधान सम्मान रॅली काढण्यात आली हजारोच्या संख्येत या मिरवणुकीत संविधान प्रेमी उपस्थित होते.

           ही मिरवणूक डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर ते जटपुरा गेट व जटपुरा गेट येथून वळसा घेऊन कस्तुरबा मार्ग,मौलाना आझाद उद्यान ते गिरनार चौक,गांधी चौक मार्गे परत डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पोहोचली. या मिरवणुकीत “संविधान दिन चिरायू होवो” अशा घोषणा देण्यात आल्या व सर्व मान्यवरांनी संविधान सन्मान दिनाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

         मिरवणुकीचे उद्घाटन पूर्वी अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी सर्व भारतीयांना संविधान दिनाचे महत्व सांगत हार्दिक शुभेच्छा दिल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव चे संयोजक बाळूभाऊ खोब्रागडे यांनी देखील सर्व उपस्थित मान्यवरांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

           सदर संविधान रॅलीत संविधान प्रतिमा झाकी, लेझीम पथक, बँड पथक, आदिवासी नृत्य, समता सैनिक दल पथक, विविध सामाजिक, राजकिय जातीय संघटना चे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते.

         उत्तम अशा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ही मिरवणूक अत्यंत आनंदात उत्साहात शांततापूर्ण वातावरणात संपन्न झाली.

            पोलीस ठाणे चंद्रपूर शहर चे पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके सह अनेक अधिकारी विशेष शाखेचे सुजित बंडीवार सह अनेक मान्यवर या प्रसंगी आपले कर्तव्य बजावत होते.

                 रॅलीचे प्रस्थान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक – जटपुरा गेट, कस्तुरबा रोड गिरनार चौक ते गांधी चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याजवळ पोहोचल्यावर प्रबोधन सभेत या मिरवणुकीचे रूपांतर झाले.

             संविधान सन्मान रॅली व प्रबोधन सभेच्या आयोजनासाठी प्रतीक डोर्लीकर, राजस खोब्रागडे, शंकर वेल्हेकर, महादेव कांबळे, दिलीप डांगे, प्रेमदास बोरकर, हरिदास देवगडे, केशव रामटेके, यशवंत मुंजमकर, विजय करमरकर, मृणाल कांबळे, पंचफुला वेल्हेकर, गीता रामटेके, ज्योती शिवणकर, अनिता जोगे, वर्षा घडसे, छाया थोरात, वैशाली साठे, अंजली निमगडे, सचिन पाटील, कैलास बांबोळकर, समता खोब्रागडे, पौर्णिमा गोंगले, प्रभूदास मावलीकर, कैलास शेंडे, मीना गोल्हटकर आदी मान्यवरांनी अथक परिश्रम घेतले,हे मात्र विशेष!

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here