दिनांक 15 ऑक्टोबर 2022 – माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम जी यांची जयंती आम आदमी पार्टी बल्लारपूर तर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती उत्सवानिमित्त पक्षातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले, यासोबतच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात आले, तसेच डॉ कलाम यांच्या जी यांची जयंती शुभमुहूर्तावर शहरातील राजेंद्र प्रसाद वॉर्डातील टेकडी विभागात पक्षाच्या दुसऱ्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घघाटनही करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष रविकुमार पुपलवार जी, निवडणूक प्रभारी नागेश्वर गंडलेवार जी, उपाध्यक्ष अफजल अली जी, सचिव ज्योतीताई बाबरे, कोषाध्यक्ष आसिफ शेख जी, युवा सचिव रोहित जंगमवार जी आणि युवा संघटक अलिना शेख जी यांनी राजकीय परिस्थितीबद्दल जागरूकता निर्माण करण्याकरिता आपले विचार मांडले.
यावेळी “आप” बल्लारपूर शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793