चंद्रपुर शहरातअवैध रित्या विक्री होत असलेल्या सुगंधित तंबाखू वर प्रतिबंध लावण्यासाठी भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे वने,सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी तथा जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले त्यामध्ये
रहेमतनगर, भानापेठ,पठानपुरा, जटपुरा अशा विविध भागात सुगंधित तंबाखू ची विक्री मोठ्या प्रमाणात केल्या जाते त्यामुळे चंद्रपुरात मुखरोग कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे या गंभीर समस्येवर आळा घातला नाही तर भविष्यात मोठ्या आरोग्याच्या समस्या निर्माण होईल करिता अवैध रित्या विक्री होत असलेल्या सुगंधित तंबाखू विक्रीवर प्रतिबंध लावण्यात यावे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केली तसेच नवनियुक्त जिल्हाधिकारी विनय गौडा यांना चंद्रपूर च्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे,सुभाष कासनगोट्टूवार
रवी गुरनुले, भारतीय जनता युवा मोर्चा महानगर अध्यक्ष विशाल निंबाळकर,महानगर सचिव चांदभाई पाशा सय्यद,मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार,दिनकर सोमलकर,मल्लेश कोडारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793