Home
Home चंद्रपूर * गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी कम्युनिटी पोलिसिंग _पोनि लता वाढीवेंनी दिली ज्येष्ठांना *

* गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी कम्युनिटी पोलिसिंग _पोनि लता वाढीवेंनी दिली ज्येष्ठांना *

0
107

==≠=====================

* चंद्रपूर.*

===================
अलिकडेच शहरात विविध स्वरूपातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: यात लहान मुले व ज्येष्ठांनाही चोरट्यांनी गंडविल्याची प्रकरणे प्रकर्षाने समोर येत आहे. यालाच आळा घालण्याकरीता शहर पोलिस ठाण्यांतर्गत महाकाली पोलिस चौकीमध्ये बुधवारी 15 फेब्रुवारीला कम्युनिटी पोलीसिंग या उपक्रमाद्वारे ज्येष्ठांना माहिती देऊन परिसरात कुठलीही संशयास्पद हालचाली व कृती दिसून आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी महाकाली पोलिस चौकीत कम्युनिटी पोलीसिंगद्वारे पोलिस निरीक्षक लता वाढीवे यांनी पोलिस मित्र योजनेविषयी परिसरातील प्रतिष्ठीत नागरिकाना माहिती दिली. पोलिसिंग कम्युनिटी म्हणजे काय याचेही विवेचन करून पोलीस दादा, पोलिस दीदी ही संकल्पना समजावून सांगितली. शाळा, महाविद्यालयातील मुला-मुलींचे असमाजिक तत्वापासून संरक्षण व्हावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. व आपल्या परिसरातील अनोळखी व्यक्ती किंवा वस्तु दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावे, असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक व प्रतिष्ठीत मंडळींचा उत्तम प्रतिसाद लाभला. यावेळी जेष्ठ नागरिकांच्या सुविधांबाबतही माहिती देण्यात आली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक विजय मुके, संजय धोटे उपस्थित होते.

======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here