Home
Home चंद्रपूर * श्री महाकाली मंदिर मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य शिबीर.*

* श्री महाकाली मंदिर मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य शिबीर.*

0
158

====================  

       * चंद्रपुर *  

==================

आज दिनांक ७-३-२०२३ जागतिक महिला दिनानिमित्त धर्मादाय आयुक्त कार्यालय चंद्रपूर श्री महाकाली मंदिर चंद्रपूर व क्राईस हॉस्पिटल चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री महाकाली मंदिर चंद्रपूर मध्ये महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्रीमती पि.के.करवंदे ( सौ. हिंगणगावकर) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम सुरू झाला. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन केले व महिला दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. महिला आरोग्य विषयक मूलभूत माहिती डॉ भंडारी मॅडम यांनी दिली व शुभेच्छा दिल्या श्री महाकाली मंदिर तर्फे मंदिराचे व्यवस्थापक श्री सुनील नामदेवराव महाकाले व अँड निमिषा महाकाले यांनी महिला दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले व सर्व भगिनींना महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. व आरोग्य शिबिराचे लाभ घेण्यासाठी विनंती केली.
डॉ भंडारी मॅडम क्राईस हॉस्पिटल चंद्रपूर व त्यांच्या वैद्यकीय चमू द्वारे शिबिरात सहभागी व इतर सर्व महिलांची मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार करण्यात आला शिबिराचा जवळपास ४०० लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिरा तर्फे श्री अनिल महाकाले, राजु पेंटर, गणेश शेळके व कर्मचारी यांनी योगदान दिले.

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here