* ३७ % वीज दरवाढीच्या विरोधात आम आदमी पक्षाच्या राज्यव्यापी आंदोलन बल्लारपूर शहरातही *

0
49

========================

* बल्लारपूर,  *

=======================

दि.27 मार्च 2023
२०१९ च्या निवडणुकीत शिवसेने ने आपल्या जाहिरातीत 300 युनिट पर्यंत 30% दर कमी करणार व 200 युनिट वीज मोफत देणार असल्याची घोषणा केली होती. एवढेच नव्हे तर मागच्या दोन वर्षांत मा. देवेंद्र फडणवीस यांनी वीज दरवाढ व मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावर येवून आंदोलन केली आहेत. परंतु आता त्यांचेच सरकार सत्तेवर असतांना मात्र जनतेला स्वस्त वीज देण्याऐवजी 37% वीज दर वाढविण्याचा शाॅक राज्यातील जनतेला मिळण्याची परिस्थिती आली आहे. त्यामुळे या गंभीर मुद्याकडे शासनाने लक्ष देऊन वीज दरवाढ थांबवून दिल्ली व पंजाब प्रमाणे किमान.  200 युनिट वीज मोफत द्यावी हि मागणी करत आम आदमी पक्ष बल्लारपुरचे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वात व जिल्हा संघठक प्रा. नागेश्वर गंडलेवार यांच्या मार्गदर्शनात आम आदमी पार्टी ,बल्लारपूर तर्फे शहरातील नगरपरिषद चौकात आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात बल्लारपुरचे शहरध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, जिल्हा संघठक प्रा. नागेश्वर गंड़लेवार,.  उपाध्यक्ष गणेश सिलगमवार, कोषाध्यक्ष आसिफ हुसैन शेख, सचिव ज्योतिताई बाबरे, महिला उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, यूथ अध्यक्ष सागर कांबळे, संघटक अलीना शेख, CYSS प्रमुख शिरीन सिद्दीकी, सहप्रमुख आशीष गेड़ाम, की. आ. प्रमुख सुधाकर गेड़ाम, रवीं नीमसटकर, बेबिताई बुरडकर, स्मिताताई लोहकरे, सचिन मत्ते, व कार्यकर्त्यांसह शहरातील अनेक नागरिकांनी सहभाग दर्शविला.

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*. 

=======================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here