मोहरम निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा कारागृहातील गैबीशाह वली समाधी स्थळाचे दर्शन घेत चादर चढवीली. यावेळी जिल्हा कारागृहाचे अधिक्षक अनुपकुमार कुमरे, रमजान अली घायल, यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्याक युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, युवा नेता ताहीर हुसेन यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
मोहरम निमित्त आज जिल्हा कारागृहातील दार भाविकांसाठी उघडे करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी कारागृहात असलेल्या गैबीशाह वली समाधी स्थळाचे दर्शन घेतले. चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनीही यावेळी जिल्हा कारागृहात भेट देत गैबीशाह वली समाधी स्थळाचे दर्शन घेत गैबीशाह वली यांच्या समाधी स्थळावर चादर अर्पण केली. यावेळी कारागृह दरगाह कमेटीच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वागत करण्यात आले.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793






















