महसूल व पोलीस विभागाच्या आशीर्वादाने तेलंगणाची रेती महाराष्ट्रात!

0
16

==============================

महसूल व पोलीस विभागाच्या आशीर्वादाने तेलंगणाची रेती महाराष्ट्रात,,
===============================
25 ते 30 हायवाने रेती तस्करी
रोज रात्री खेळ चाले  ================================   कोरपना, आदीलाबाद जिल्ह्यातील मजरा येथून कोरपना मार्गे 25 ते 30 हायवा वाहनाने रोज रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी राजुरा गडचंदुर जिवती या भागात मोठ्या प्रमाणे होत असून पोलीस प्रशासन व महसूल विभाग मुंग गिळून गप्प बसल्याने महाराष्ट्र शासनाचे महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे एवढ्या बिनधास्तपणे वाहन चालत असताना सुद्धा पोलीस व महसूल विभाग यांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने त्या शासनाप्रती जनता संताप व्यक्त करीत आहे
असून तालुक्यातील विविध गाव, शहरात नाना प्रकारे बांधकाम सुरू आहे. यामुळे रेतीची मागणी वाढली आहे. सध्यातरी तालुक्यात रेती घाट सुरू नसल्यामुळे अवैध रेती तस्करांना सुगीचे दिवस आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस व महसूल विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवायांचे सत्र सुरू असतानाही लपूनछपून रेतीची तस्करी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर गडचांदूर राजुरा जिवती येथे मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू आहे.       =============================            हायवा वाहनाने व काही इतर ठिकाणचे पोलीस कर्मचारी ? आयशर, पल्ला गाडी, हायवा वाहनाने रात्रीच्या सुमारास बेला, कोरपना मार्गे रेती भरून गडचांदूर राजुरा व जिवती परिसरातील गावखेड्यात विक्री करत आहेत. शंका येऊ नये म्हणून वाहनांवर ताडपत्री बांधून बिनधास्तपणे रेतीची वाहतूक होत आहे. रेती भरून येत असताना काही धोका तर नाही ना, याची माहिती देण्यासाठी कोरपना येथे दोन ते तीन जणांना तैनात करण्यात आल्याची सुद्धा माहिती आहे. एक हायवा 45 ते 50 हजार तर आयशर 21 ते 23 हजार, असे दर आकारले जात असून याठिकाणी गोरगरीब गरजवंतांची अक्षरशः लूट सुरू आहे. विशेष म्हणजे यामध्ये घरकुल धारकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याची संतापजनक बोंब सुरू आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कोरपना मार्गे गडचांदूर राजुरा जिवती पर्यंतचे एवढे मोठे अंतर पार करून सदर वाहने बेधडकपणे रेती भरून वाहतूक करत असताना महसूल विभाग, पोलीस प्रशासन यापासून अनभिज्ञ कसे ? हा मात्र संशोधनाचा विषय ठरत आहे. कदाचित पोलीस कर्मचा ===========================            असल्याने कारवाईला बगल तर दिली जात नसावी
अशी शंका व्यक्त केली जात असून या रोज रात्री चालणाऱ्या रेती तस्करी ला लगाम लावण्याची मागणी होत आहे,  ============================                  चार ठाणे तीन तहसीलदार तरी कारवाई शून्य
कोरपणा गडचांदूर राजूरा जिवती या पर्यंत पोहोचण्याकरिता तीन ते चार पोलीस स्टेशन तसेच दोन ते तीन तहसील कार्यालया कर्मचारी यांना चकमा देत मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत आहे मात्र नाममात्र कारवाई दाखवून मोठ्या प्रमाणात रीती तस्करांना खुली छूट दिल्याचे चित्र सध्यातरी या चार तालुक्यातील दिसत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रीती तस्करी होत असताना सुद्धा कारवाई होत नाही हा मात्र संशोधनाचा विषय ठरत आहे,  ================================ जिल्हाधिकारी लक्ष देणार काय?
सध्याच्या परिस्थितीमध्ये या चार तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रीती तस्करी सुरू असताना सुद्धा संबंधित महसूल विभाग व पोलीस विभाग मुंग गिळून गप्प बसल्याने संबंधित विभागावर जनतेला विश्वास नसल्याचं स्पष्ट दिसत आहे तरी संबंधित अधिकाऱ्याने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी तालुक्यातील नागरी करत आहे,  =============================             *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*  ==============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here