किशोर जोरगेवार दिलेला शब्द पाळणारे आमदार – दिलीप जैयस्वाल

0
39

विसापूर येथील बिपीएड मैदानात पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

काही दिवसांपूर्वी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी या मैदानावर येऊन पोलीस भरतीचा मैदानी सराव करत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. यावेळी साहित्य उपलब्ध करुन देण्यासह येथे पोलिस भरती प्रशिक्षण केंद्र सुरु करुन प्रशिक्षकाची नेमणुक करण्याचे आश्वासन दिले होते. दिलेले आश्वासन तात्काळ पुर्ण करत येथे साहित्य उपलब्ध करण्यासह प्रशिक्षण केंद्र त्यांनी सुरु केले  असुन किशोर जोरगेवार हे दिलेला शब्द पाळणारे आमदार असल्याचे प्रतिपादन बिपीएड काॅलेजचे संस्थापक दिलीप जैयस्वाल यांनी केले.
विसापूर येथील बिपीएड काॅलेजच्या मैदानात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरु करुन स्वखर्चातून येथे तज्ञ प्रशिक्षकाची नेमणूक केली आहे. नुकतेच या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कल्याणी किशोर जोरगेवार, बल्लारशाह पोलिस ठाण्याचे एपीआय शैलेश ठाकरे, विसापूरचे माजी उपसरपंच अनकेश्वर मेश्राम, पोलिस सेवेतुन निवृत्त झालेले प्रशिक्षक देशकुमार ख्रोबागडे, माजी सैनिक विष्णु धुर्वे, शालीनी जैयस्वाल, यंग चांदा ब्रिगेडच्या साहिली येरणे, निलिमा वनकर, माधुरी निवलकर, अल्का मेश्राम आदींची उपस्थिती होती.
विसापूर येथील बिपीएड काॅलेजच्या मैदानावर चंद्रपूर विसापूर येथील शेकडो विद्यार्थी पोलीस भरतीचा मैदानी सराव करत आहे. येथे पोलीस भरतीच्या सरावासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करुन देत प्रशिक्षक नेमून प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले होत. दरम्यान येथे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले असुन प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. नुकतेच या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलतांना बिपीएड काॅलेजचे संस्थापक दिलीप जैयस्वाल यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन करत सरावाबाबत माहिती दिली.

यावेळी कल्याणी किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्राचा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घेत पोलीस भरतीबाबत माहिती समजून घेण्याचे आवाहण विद्यार्थ्यांना केले. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सामाजिक कार्य केल्या जात असून पोलीस भरती दरम्याण विद्यार्थ्यांना सरावासाठी सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी बल्लाशाह पोलिस ठाण्याचे एपीआय शैलेंद्र ठाकरे यांनी पोलिस भरतीचा सराव करत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत परिश्रम घेतल्या शिवाय यश प्राप्त होत नाही. मैदानावरील सराव हा आवश्यक आहेच सोबतच पेपरची तयारीही विद्यार्थ्यांनी करावी असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला पोलीस भरतीचा सराव करत असलेल्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here