महिलांनी समाजकारणासह राजकारणात देखील सक्रीय भाग घ्‍यावा

0
36

जनहिताच्‍या योजना सर्वसामान्‍य लोकांपर्यंत पोहचवाव्‍या – सौ. सुरेखा लुंगारेसौ. आसावरी देशमुख सौ. रेखा डोळस यांचे प्रतिपादन.

 

आदरणीय नामदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार वने, सांस्‍कृतीक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय व चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री यांच्‍या मार्गदर्शनात व मा. चित्राताई वाघ प्रदेशाध्‍यक्ष भाजपा महिला मोर्चा यांच्‍या सुचनेनुसार दिनांक २१ डिसेंबर २०२२ ला डॉ श्‍यामप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्‍हा महानगर व चंद्रपूर जिल्‍हा ग्रामीण यांची भाजपा महिला मोर्चाची बैठक संपन्‍न झाली. या बैठकीला सौ. वनिता कानडे उपाध्‍यक्ष भाजपा प्रदेश, प्रदेश सचिव सौ. सुरेखा लुंगारे अमरावती, सौ. आसावरी देशमुख वैद्यकिय प्रकोष्‍ठ नागपूर तसेच सौ. रेखा डोळस प्रदेश सदस्‍य गडचिरोली आणि यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. ही बैठक सौ. अंजली घोटेकर जिल्‍हाध्‍यक्ष महानगर व कु. अल्‍का आत्राम जिल्‍हाध्‍यक्ष ग्रामीण भाजपा महिला मोर्चा यांच्‍या नेतृत्‍वात घेण्‍यात आली.

 

आपल्‍या मार्गदर्शनात बोलताना सौ. सुरेखाताई लुंगारे म्‍हणाल्‍या की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या जनकल्‍याणाच्‍या अनेक योजना कार्यान्‍वीत आहे. देशातील सर्वसामान्‍य नागरिकांच्‍या लाभाकरिता या योजनांच्‍या माध्‍यमातुन काम केल्‍या जात आहे. अनेक योजनांचा लाभ नागरिकांनी घेतलेला आहे ज्‍यात कोविड लसीकरण, कोविडच्‍या वेळेस आलेले अनुदान, मोफत अन्‍नधान्‍य, अमृत पाणी पुरवठा, गॅस सुविध, घरकुल सुविधा, आरोग्‍य सुविधा यांचा समावेश आहे आणि म्‍हणूनच आपल्‍याला सुध्‍दा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍याबद्दल कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍याकरिता मोदीजींना धन्‍यवाद मोदीजी हे पत्र पाठविणे गरजेचे आहे. यावेळी आसावरी देशमुख यांनी भाजपा महिला मोर्चाच्‍या प्रत्‍येक पदाधिकारी, सदस्‍य आणि कार्यकर्त्‍यांनी फेसबुक, व्‍हॉट्सअॅप आणि व्‍टीटरचे अकाऊंट ओपन करून आपले सरकार ज्‍या चांगल्‍या जनहिताच्‍या योजना अंमलात आणत आहेत त्‍याचा प्रसार आणि प्रसार केला पाहीजे. यावेळी सौ. रेखा डोळस आणि सौ. वनिता कानडे यांचे समयोचित मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक जिल्‍हाध्‍यक्षा सौ. अंजली घोटेकर यांनी केले व चंद्रपूर महानगराचा आढावा दिला तर जिल्‍हाध्‍यक्ष अलका आत्राम यांनी ग्रामीण भागाचा आढावा दिला. संचालन निलम सुरमवार यांनी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्‍मी सागर यांनी केले.

 

या बैठकीला सौ. रत्‍नमाला भोयर, सौ. शिला चव्‍हाण, सौ. लक्ष्‍मी डोहे, सौ. माधुरी बोरकर, सौ. वंदना शेंडे, सौ. रेणु घोडेस्‍वार, सौ. कविता सरकार, सौ. मुक्‍ता येरगुडे, सौ. सुनिता काकडे, सौ. संगीता निंबाळकर, सौ. सुनिता मॅकलवार, सौ. रजिया कुरेशी, सौ. माधुरी मोरे, सौ. माया उईके, सौ. चंद्रकला सोयाम, सौ. सुषमा नागोसे, सौ. पुष्‍पा उराडे, सौ. वंदना संतोषवार, सौ. सुरेखा श्रीकोंडावार, सौ. अश्विनी तोडासे, सौ. योगिता वडस्‍कर, सौ. किर्ती कातोरे, सौ. माधुरी मोरे, सौ. श्‍वेता वनकर, सौ. वंदना कोटरंगे, सौ. वैशाली बोलमवार, सौ. मनिषा दुर्योधन, सौ. विशाखा राजुरकर, सौ. अनु मोडपल्‍लीवार, सौ. शारदा गरपल्‍लीवार, सौ. स्‍वाती वडपल्‍लीवार, सौ. शारदा गुरनुले, सौ. गुड्डी सहारे, सौ. अरूणा चौधरी, सौ. गिता महाकुलकर, सौ. मंजरी राजनकर, सौ. रोहिणी ढोले आदींसह असंख्‍य महिला पदाधिका-यांची उपस्थिती होती.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here