पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने रस्‍ते बांधकामासाठी १९.७५ कोटी रू. निधी मंजूर

0
25

 

राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने त्‍यांच्‍या बल्‍लारपूर विधानसभा मतदार संघात १९ कोटी ७५ लक्ष रू. किंमतीची विकासकामे मंजूर करण्‍यात आली आहे.

 

सन २०२२-२३ च्‍या पुरवणी मागण्‍यांच्‍या माध्‍यमातुन या विकासकामांसाठी १९ कोटी ७५ लक्ष रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे. या मंजूर विकासकामांमध्‍ये प्रामुख्‍याने पेटगांव-भादुर्णी-मारोडा –मुल-चिचाळा-भेजगांव-बेंबाळ रस्‍त्‍याची सुधारणा करणे या कामासाठी १० कोटी रू. निधी, पोंभुर्णा तालुक्‍यातील वैनगंगा नदीवरील जुनगांव गावाजवळ प्रस्‍तावित मोठया पुलाच्‍या पोचमार्गाकरिता भुसंपादन व सेवावाहीनी स्‍थलांतरीत करणे या कामासाठी ३ कोटी रू. निधी,  कोळसा-झरी-पिंपळखुट-अजयपूर-केळझर-चिरोली-चिचाळा-ताडाळा-बोरचांदली रस्‍त्‍याची सुधारणा करणे या कामासाठी ३ कोटी ७५ लक्ष रू. निधी, आक्‍सापूर-चिंतलधाबा (प्रजिमा२४) रस्‍त्‍याच्‍या रूंदीकरणासह मजबुतीकरण, डांबरीकरण व सिमेंट कॉंक्रीट नालीचे बांधकाम करणे या कामासाठी ३ कोटी रू. निधी असा एकूण १९ कोटी ७५ लक्ष रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे.

 

नुकताच केंद्रीय मार्ग निधीतुन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा तालुक्‍यातील दोन उंच पुलाच्‍या बांधकामासाठी ११० कोटी रू. निधी मंजूर करण्‍यात आला असून विविध योजनांच्‍या माध्‍यमातुन रस्‍ते व पुल बांधकामासाठी सातत्‍याने मंजूर होणा-या निधीअंतर्गत बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात पायाभूत सुविधांचे जाळे विणले जात आहे.

==≠===========÷÷÷÷====÷÷=÷÷÷÷÷=

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===========÷÷=======≠=≠==÷÷÷÷

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here