माता महाकाली मंदिराच्या परिसरात जनसुविधेची कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करा – आ. किशोर जोरगेवार अधिवेशनात मागणी

0
33

चंद्रपुर शहर

================================

चंद्रपूची आराध्य दैवत माता महाकाली मंदिर परिसरात जनसुविधेची कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. झाडीपट्टी नाट्यगृहासाठी निधी देण्याची मागणीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
अधिवेशानाच्या तिस-या दिवशी नगर विकास विभागाच्या भाग क्रमांक १०९ पुर्व सुविधा अंतर्गत विषयावर बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी माता महाकाली मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. यावेळी सभागृहात बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर हे माता महाकालीचे शहर म्हणून ओळखले जाते, विद्यमान मुख्यमंत्री तत्कालीन नगर विकास मंत्री असतांना आणि आताचे उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री असतांना त्यांनी माता महाकाली मंदिराच्या विकासासाठी ५९ कोटी  रुपये मंदिराच्या बांधकामाला दिले. या कामाच्या निविदेला मंजुरीही देण्यात आली आहे. मात्र आता टप्पा २ च्या कामासाठी ७५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. येथील झरपट नदीच्या ठिकाणी असलेल्या घाटांची, मंदिर प्रवेशद्वार यासह मंदिर परिसरात जनसुविधेची कामे करण्यासाठी या निधीची आवश्यकता असुन सदर निधी अर्थमंत्री यांनी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
चंद्रपूर, गडचिरोली, भंडार आणि गोंदीया या चार जिल्हांमध्ये झाडीपट्टी रंगभूमी आहे. जवळपाच ५० ते ६० हजार कलावंत येथे आहे. मनोरंजनासह सामाजिक प्रबोधनाचे काम या झाडीपट्टी कलावंताच्या वतीने केल्या जात आहे. ग्रामीण भागामध्ये काही काळापुरते त्यांच्या नाटकाचे प्रयोग होतात. इतर वर्षभर मात्र त्यांना आपले नाटक सादर करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. चंद्रपूरात असलेल्या नाट्यगृहाचे भाडे या कलावतांना परवडण्यासारखे नाही. त्यामुळे या झाडीपट्टी कलावंतांना अद्यावत नाट्यगृह नगर विकास माध्यमातुन तयार करण्यात यावे अशी मागणी यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

घुग्घुस शहराच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांचा निधी द्या – आ. किशोर जोरगेवार
अधिवेशनात मागणी
घुग्घूस शहराच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. यासाठी विविध विभागातुन मोठा निधी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपलब्ध करुन दिला आहे. अधिवेशनाच्या तिस-या दिवशी सभागृहात बोलतांना पून्हा एकदा आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घुस येथील विकास कामांचा मुद्दा उपस्थित केला असुन घुग्घसु शहराच्या विविध विकास कामांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी सभागृहात केली आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारने घुग्घुस नगर पालिकेची स्थापना केली आहे. मात्र नगर परिषदेच्या निकषानुसार येथे विकास कामांना गती मिळालेली नाही ६०  हजार लोकवस्ती असलेले हे शहर विकासापासून दुर जात आहे. त्यामुळे येथे विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी सभागृहात बोलतांना ते म्हणाले कि, महाविकास आघाडीच्या काळात घुग्घुस ग्रमापंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला. परंतु येथे अनेक सोयी सुविधा करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये नगर पालिका कार्यालय, स्टेडीयम, रस्ते, नाले, उद्यान यासह इतर पायाभुत कामांसाठी ५०  कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा अशी मागणी यावेळी बोलतांना त्यांनी केली आहे.

==========================

  • *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======÷=÷=÷÷≠===≠=======

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here