महानगर पालिकेच्या शाळा स्मार्ट करण्यासाठी निधी देणार – आ. किशोर जोरगेवार आम

0
32

 

आमदार किशोर जोरगेवार हे चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या शाळा स्मार्ट करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यार असुन यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांना निवेदन दिले आहे. याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांचा सातत्याने पाठपूरावाही सुरु आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या कडून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्या जात आहे. चंद्रपूर मतदार संघात विद्यार्थांना निशुल्क अभ्यास करता यावा या करिता १३ अभ्यासीका तयार केल्या जात आहे. तर मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले शिक्षण घेत असलेल्या शिक्षण संस्थांना सुसज्ज लॅब, इंटरनेट, संगणक यासारख्या महत्वाच्या सुविधा आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने उपलब्ध करुन दिल्या जात आहे. दरम्यान आता चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या शाळा अद्यावत करण्याचा संकल्प आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतला असुन त्यांच्या तर्फे सदर शाळेंच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.
पिएम श्री. योजने अतंर्गत चंद्रपूर शहरातील महानगर पालिकेच्या १२ शाळांची निवळ करण्यात आली आहे. तर सदर शाळेच्या वर्ग खोली व इतर बांधकामासाठी खनिजी विकास निधीतुन निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. तसे पत्रही मनपा आयुक्त विपिन  पालीवाल  यांना पाठविण्यात आले आहे. याच्या पहिल्या टप्यात १३ कोटी रुपये दिल्या जाणार असून यातुन ३ शाळेंचे काम करण्यात येणार आहे. यासाठी खनीकर्म मंत्री दादाजी भुस यांना सदर निधीची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल यांनाही पत्राद्वारे याबाबत अवगत करण्यात आले आहे.

======≠===========≠=======

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

 

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here