======================
* भद्रावती *.
=================
आज दि. 09 मार्च 2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे सुमित भाऊ हस्तक यांच्या नेतृत्वात व सुरज भाऊ शहा यांच्या मार्गदर्शनात मुख्याधिकारी साहेब व इंजिनियर साहेब नगरपरिषद भद्रावती यांची भेट घेण्यात आली. मागील काही वर्षापासून शासकीय रुग्णालय भद्रावती समोरचा रोड अतिशय खराब अवस्थेत आहे. त्या रोडची सुधारणा मागील काही वर्षापासून रखडलेली आहे. याचं कारण काय आहे ? जनतेला त्या रोडांच्या खड्ड्यांमुळे खूप अडचण भोगावे लागत आहे. असे सुद्धा दिसून येत आहे की त्या रोडमध्ये खूप सारा भ्रष्टाचार झाला आणि कामाचा पैसा भ्रष्टाचारी लोकांच्या खिशात गेला ? असा प्रश्न सुद्धा विचारण्यात आला. शासकीय रुग्णालय भद्रावती येथे उपचारासाठी असंख्य रुग्ण येतात, त्यांना सुद्धा या खराब रोडांमुळे अडचण सहन करावी लागते. तत्काल या रोडाच नूतनीकरणाचा काम सुरू करण्यात यावे या संबंधित निवेदन सुद्धा देण्यात आले. यावेळी इंजिनीयर साहेब यांनी चांगल्या दर्जेचं रोडचं काम लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन दिले. यावेळी आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष सुरज भाऊ शहा, शहर उपाध्यक्ष सुमीत हस्तक, तालुका अध्यक्ष सोनाल पाटिल, शहर उपाध्यक्ष आशिष भाऊ तांडेकर, शहर सचिव विजय सपकाळ, शहर संघटन मंत्री अनिलकुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, शहर सहसचीव सचिन पाटील, महिला शहराध्यक्ष प्रतिभा कडूकर, शहर महिला कोषाध्यक्ष रेखाताई गेडाम, डोलारा प्रभाग प्रमुख केशवभाऊ पचारे, युवा शहर सचिव अतुल रोडगे, मंगेशभाऊ खंडाळे, सुधिरभाऊ घांगळे, प्रफुल्लभाऊ शेलार, श्यामभाऊ पिंपळकर, नितीनभाऊ देवगड़े, रितेशभाऊ नगराळे, राजेशभाऊ नरवडे, बाळू बांदुरकर, प्रदीप लोखंडे, चेतन खोब्रागडे, संजय भाऊ सातपुते, डोरीभाऊ स्वामी, व्यापारी आघाडी प्रमुख घनश्याम भाऊ गेडाम, आनंद CVभाऊ पुसाटे व इतर कार्यकर्ते उपस्थीत होते.
=====≠==================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793






















