*भिम गर्जना महिला बहुउदेशिय संस्थेच्या वतीने जागतिक महीला दिन उत्साहात साजरा.*

0
36

=========================

   *चंद्रपुर -*    

===================

* न्यूज एडिटर निलेश ठाकरे *. 

===========================

आज ची महिला पूर्णत: ही आधी सारखी महिला राहीली नसुन ती प्रत्येक बाबतीत आता आत्मनिर्भर आणि सशक्त असुन पुरुषांच्या बरोबरीने नवे आव्हान नवे ध्येय काही संकल्प घेवुन के पुर्ण करण्यास सज्ज व सक्षम दिसुन येत आहेत. स्वताचा पाया मजबुत करत आपली एक वेगळी ओडख स्वताच निर्माण करू लागली आहे. पुरूषांनी सुध्दा स्वीकार करायला हवे की घर आणि समाजाची उत्तमता यासाठी पुरुषांन पेक्षा महिलांचे याेगदान जास्त आहे. अश्यातच चंद्रपुर येथिल काही महिलांनी एकत्रीत येवुन येवुन भिम गर्जना बहुउदेशिय संस्था निर्माण करित सामाजिक कार्याच्या माध्यमातुन आपले याेगदान देण्यास पुढे सरसावल्या आहेत. ह्या याच महिला आहेत ज्यानी अथक परीश्रम घेवुन भिम गर्जना या नावानी महिला बँड पथक तयार करून चंद्रपुर जिल्ह्यातल प्रथम महिला बँड पथक असल्याचा मान मिळवला. सामाजिक क्षेत्रात गरूडपक्षी उंच झेप घेतली. दिनांक ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्य भिम गर्जना बहुउदेशिय संस्था चंद्रपुरच्या वतीने संस्थेच्या सर्व महिलांनी किलबिल अनाथालय येथे जाऊन संस्थे मार्फत सायंकाळी ५:०० वाजता प्रत्यक्ष जाऊन तीथे असलेल्या लाहान मुल व मुली यांच्या साेबत वेळ घालवत त्यांच्या प्रकृतीचे विचारपुस करून गरज असलेल्या वस्तुचे दान करण्यात आले. जागतिक महिलादिनी आज जिल्ह्यात सर्वत्र कार्यक्रम राबवण्यात आले असतांना ज्या मुला मुलिंना भावनिक आधाराची गरज असते. अश्या किलबिल अनाथालयात जाऊन अगदी दुधावर असलेले अकरा नवजात शिशुंना बघुन संस्थेच्या प्रत्येक महिलांचे डाेळे पाणावुन गेले. सर्व महिलांना आपल्या संस्थेच्या माध्यमातुन जागतिक महिलादिनी किलबिल येथे भेट देत महिलादिन साजरा करण्याचा एक वेगळाच आनंद अनुभवला. यात भिम गर्जना बहुउदेशिय संस्थेच्या पदधिकारी तथा सभादांनी आपला सहभाग दिला.

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

======================

  1. संपादक :- शशी ठक्कर 9881277793

======================

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here