* वसतिगृह गरीब, गरजू, बेघर मुलांसाठी हक्काचा निवारा ठरेल – आ. किशोर जोरगेवार *

0
17

*********************

* वसतिगृहाच्या बांधकामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन

——————————–

शिक्षण क्षेत्रात भरीव काम करण्याचा संकल्प आपण केला आहे. मतदारसंघात गरजु विद्यार्थ्यांसाठी आपण 11 अभ्यासिका तयार करत आहोत. तर बाहेर गावातुन चंद्रपूरात शिक्षण घेण्यासाठी येणा-या मुलांच्या तसेच बेघर मुलांच्या राहण्यासाठी वसतिगृह उभारण्याकरिता 25 लक्ष रुपयांचा निधी देता आला याचा आनंद आहे. तयार होत असलेले हे वसतिगृह गरीब, गरजु, बेघर मुलांसाठी हक्काचा निवारा ठरले असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

————————————-

डॉ. अशोक वासलवार संस्थापक अध्यक्ष असलेल्या संकल्प संस्थेला वसतीगृह बांधकामासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी शहर विकास निधीतून 25 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतुन इंदिरा नगर येथे तयार होत असलेल्या वसतिगृहाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. सदर भुमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला संकल्प संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक वासलवार, कोषाध्यक्ष डॉ. सिमजा गाजरलावार, सहसचिव कुंदन खोब्रागडे, नानाजी चटकी, चिंतामण येवले, दौलत पंदिले, स्वप्निल मेश्राम, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभाग जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, अल्पसंख्याक विभागाचे युथ अध्यक्ष राशेद हुसेन, शहर संघटक विश्वजीत शाहा, तापुष डे, चंद्रशेखर देशमुख, बंगाली समाज महिला शहर संघटिका सविता दंडारे, आशा देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

———–‐——————–

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, आपण मतदार संघाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून शहरातील विविध विकास कामे केल्या जात आहे. शहरी भागासह ग्रामीण भागाच्या विकासालाही गती देण्यासाठी वेगवेगळ्या विभागाअंतर्गत मोठा निधी आपण उपलब्ध केला आहे. हे सर्व विकासकामे होत असतांना आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात भरीव काम करण्याचा आपला संकल्प आहे. त्या अनुषंगाने आरोग्य आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरु करत असुन या अंतर्गत महापलिकासह आपण शहरातील 11 ठिकाणी भव्य आरोग्य शिबिरे आयोजित करत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

————————————-

मतदार संघात आपण 11 अभ्यासिका तयार करत आहोत. यातील सात अभ्यासिकांच्या कामाला सुरवात झाली असुन तिन अभ्यासिकांचे काम अंतिम टप्यात असल्याचे ते यावेळी म्हणाले. संकल्प संस्था सामाजिक क्षेत्रात कौतुकास्पद काम करत आहे. सध्या त्यांच्या वतीने मुलींना शिवणकाम प्रशिक्षण दिल्या जात आहे. यावेळी हे प्रशिक्षण घेत असलेल्या मुलींची भेट घेतली तेव्हा काहीतरी नविन शिकता येत असल्याचे त्यांच्या चेह-यावर समाधान दिसत होते. मात्र या शिक्षणाचा आर्थिक विकासासाठी उपयोग करावा असेही यावेळी आ. जोरगेवार म्हणाले. आपणही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विविध ठिकाणी शिवणकामाचे प्रशिक्षण देत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या भूमिपूजन सोहळ्याला संकल्प संस्थेच्या सदस्यांसह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

***********************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here