*प्रशांत घुमे यांची रायुकाँच्या गडचिरोली प्रभारी पदी निवड.*

0
27

***************************

चंद्रपूर:- राष्ट्रवादी युवक काँग्रसचे चिमुर विधानसभा अध्यक्ष प्रशांत घुमे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रदेश सरचिटणीस व गडचिरोली जिल्हा प्रभारी पदी आज निवड करण्यात आली.

***************************

प्रशांत घुमे हे मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धडपडीने कार्य करीत असुन काहीही पाठबळ नसताना ग्रामीण भागात पक्ष वाढावा याकरिता सदैव ऍक्टीव्ह मोड मध्ये असतात.

**********************

यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिमुर विधानसभा अध्यक्ष म्हणून यांच्याकडे जवाबदारी होती. प्रतिकूल परिस्थितीत पक्षाला अपेक्षित बांधणी घुमे यांनी केली असल्यानेच त्यांची प्रदेश राष्ट्रवादीने दखल घेतल्याचे बोलले जात आहे.

,**************************

सदर निवड राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल व विरोधी पक्ष नेते मा. अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मान्यतेने रायुकाँ प्रदेशाध्यक्ष मा. महेबुब शेख यांनी केली असुन याबाबत अधिकृत पत्र काढण्यात आले.

*****************************

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बांधणीत उत्साहीपणे व  सामंज्यसपणे कार्य करणाऱ्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठी संधी दिल्याबद्दल प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर व जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटिल, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व रायुकाँ प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांचे आभार मानले.

*******************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*******************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here