*बैंक ऑफ इंडिया राजुरा शाखेच्या ग्राहक सेवा केंद्रात ग्राहकांच्या लाखो रूपयांची अफरातफर झाल्याची शहरात चर्चा।* *सदर ग्राहक सेवा केंद्र मागील दहा दिवसां पासून बन्द*

0
30

=========================== 

*राजुरा*           ============================                  बँक ऑफ इंडियाच्या राजुरा शाखेच्या सेवा केंद्रात ग्राहकांच्या रकमेचा अपहार झाल्याची चर्चा शहरात सुरू असुन ही रक्कम काही लाखांच्या घरात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच हे ग्राहक सेवा केंद्र मागील 8 ते 10 दिवसांपासून बंद असल्याने ग्रहकमध्ये असंतोष दिसत आहे। प्राप्त माहितीनुसार शहरात मुख्य बाजारपेठेत असलेल्या नगर पालिकेच्या संजय गांधी मार्केट ह्या इमारतीत बँक ऑफ इंडियाचे सेवा केंद्र सुरू केले असुन ह्या केंद्रातून बँकेचे ग्राहक खाते उघडणे, रक्कम जमा करणे त्याचप्रमाणे रक्कम काढणे इत्यादी कामे केल्या जातात. ह्या बदल्यात बँकेतर्फे सेवा केंद्राला प्रत्येक कामासाठी विशिष्ठ मोबदला दिल्या जातो. ===========================                    मात्र राजुरा येथिल बँक ऑफ इंडियाच्या सेवा केंद्रात लाखोंचा घोटाळा झाला असल्याची शहरात जोरदार चर्चा असुन सेवा केंद्र संचालकांनी कित्येक ग्राहकांकडून केंद्राच्या क्षमतेपेक्षा जास्त रक्कम खात्यात जमा करण्यास स्वीकारली. ग्राहकांना दोन किंवा तीन टप्प्यात रक्कम जमा करण्यात येईल असे सांगितले. ग्राहकांनी देखिल ह्यावर विश्वास ठेऊन मोठ्या रकमा सेवा केंद्र संचालकांच्या स्वाधिन केल्या. सुरवातीला ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रामाणिकपणे रक्कम खात्यात जमा करण्यात येत होती मात्र कालांतराने विश्वास संपादन झाल्यानंतर रक्कम जमा होण्यासाठी विलंब होणे सुरू झाले. कधी नेटवर्क फेल तर कधी इतर करणे देऊन वेळ मारून नेणे सुरू झाले मात्र ही रक्कम काही लाखांच्या घरात गेल्यानंतर आपल्याला ग्राहकांचे पैसे परत करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने मागील आठ ते दहा दिवसांपासून सेवा केंद्र बंद असल्याने ग्राहकांच्या मनातील चलबिचल वाढली आहे. बैंक ऑफ इंडिया च्या राजुरा शाखे ने या प्रकारा बाबत कहिहि माहित नसून कोणत्याही ग्रहकची लेखी तक्रार आली नसल्याचे स्पष्ट केले। मात्र मागील काही दिवसांपासून उक्त ग्राहक सेवा केंद्र बंद असल्याबाबत दुजोरा दिला।==============================          *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here