Home
Home Breaking News दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या इसमास अटक!17 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या इसमास अटक!17 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

0
85

================================

                         चंद्रपूर 

             हॅलो चांदा न्यूज 

चंद्रपूर(का.प्र.): दिनांक २९/०३/२०२५ रोजी एक संशयीत चारचाकी वाहन नागभिड कडुन तळोधी कडे येत असल्याची मुखबीर द्वारे खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशन तळोधी चे ठाणेदार स.पो.नि. संगीता शंकरराव हेलोंडे यांनी आपल्या सोबत पो.उप.नि. किशोर मानकर, डि.ओ. पो.हवा. रत्नाकर देहारे १९२९, म.पो.अं. वैष्णवी लेनगुरे २०२३, पो.अं. उत्तम धुगवा ३८३, होमगार्ड सैनिक पवन आखरे १२५५, चा.पो.हवा. सुरेश आत्राम ४९० सह सोबत २ पंच असे सर्व मीळून नागभिड ते सिंदेवाही जाणा-या हायवे रोडवर चिखलगाव फाटा येथे नाकेबंदी करीत असताना एक पांढ-या रंगाचे चारचाकी वाहन येताना दिसले. तेव्हा स.पो.नि. संगीता हेलोंडे यांनी पो. स्टाफ चे मदतीने पंचासमक्ष सदरचे चारचाकी वाहन थांबवण्याचा ईशारा केल्याने सदर वाहन चालकाने वाहन थांबविले.सदरचे वाहन हे महिंद्रा एक्स. यु. व्ही. ५०० क. एम.एच.४० बी.सी.०३८८ असे असुन सदरचे वाहन रोडचे कडेला घेवुन वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यात रॉकेट देशी दारू खरडयाचे खोके दिसले. तेव्हा सदर वाहनामध्ये अवैद्य देशी दारू असल्याचा ठाणेदार सपोनि संगीता हेलोंडे व पोलीस स्टॉफ यांना दाट संशय आल्याने वाहन चालकाला पोलीसांचा व पंचांचा परिचय देवुन पंचासमक्ष वाहन चालकाचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख अरशद ईकबाल अहमद वय २७ वर्ष रा. गौतम वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा असे सांगीतले.

सदर वाहन चालकाला त्याचे वाहनामधे दिसुन आलेल्या देशी दारूच्या खोक्याबाबत पाहणी करण्याचा उद्देश समजुन सांगुन सदर वारचाकी वाहनाची पंचासमक्ष पो. स्टाफ च्या मदतीने पाहणी केली असता त्यात ६० खरड्याचे खोके दिसले. पंचासमक्ष एक खर्ड्याचा खोका फोडुन पाहणी केली असता त्यात रॉकेट देशी दारू संत्रा प्रवरा नगर डिस्टिलरी देशी दारूनी भरलेल्या प्रत्येकी ९० एम.एल.च्या १०० प्लास्टीक सिलबंद शिशा दिसल्या. अशा ६० खोक्यामधील एकुण ६००० नग रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीचे लेबल असलेल्या प्रत्येकी किंमत ३५/-रु. प्रमाणे २,१०,०००/-रू. चा माल मीळून आला. सदर मालाबाबत परवाना विचारला असता वाहन चालकाने कोणत्याही प्रकारचा परवाणा नसल्याचे सांगीतले. यावरून वाहन चालकाचे ताब्यात मीळून आलेली देशी दारू ही अवैद्य असल्याने ती देशी दारू व वाहतुकी करीता वापरलेले वाहन महिंद्रा एक्स. यु. व्ही.५०० क. एम. एच. ४० बी. सी. ०३८८ किंमत १५,००,०००/-रू. असा एकुण १७,१०,०००/-रू. चा माल पंचासमक्ष मोक्यावर जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून ताब्यात घेण्यात आला.

स.पो.नि. संगीता हेलोंडे, ठाणेदार, पो. स्टे. तळोधी बा. यांचे लेखी रिपोर्ट वरून अपराध क्रमांक ००३७/२०२५ कलम ६५ (अ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही चंद्रपुर पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, श्रीमती रिना जनबंधु अपर पोलीस अधीक्षक चंद्रपुर, दिनकर ठोसरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनात श्रीमती संगीता हेलोंडे, प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन तळोधी बा., पोलीस उप निरीक्षक किशोर मानकर, पो.हवा. रत्नाकर देहारे १९२९, म.पो.अं. वैष्णवी लेनगुरे २०२३, पो.अं. उत्तम घुगवा ३८३, होमगार्ड सैनिक पवन आखरे १२५५, चापोहवा सुरेश आत्राम ४९० पोलीस स्टेशन तळोधी यांनी केली.

पुढील तपास स.पो.नि. संगीता हेलोंडे प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन तळोधी यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. किशोर मानकर हे करित आहेत.   =====================  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   ==============================                 *हॅलो चांदा न्यूज,                         मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*             *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here