Home
Home चंद्रपूर सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर महाकालीनगरीत उदया देवीच्या गित्यांचा जागर.

सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर महाकालीनगरीत उदया देवीच्या गित्यांचा जागर.

0
76

शहनाज अख्तर गायिका माता महाकाली च्या सेवेत स्वराने करेल मंत्रमुग्ध.

सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर उद्या चंद्रपूर नगरीत मातेच्या सेवेत देवी जागरात विलीन. 

महाकाली यात्रा परिसरात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाला होणार सुरुवात

               हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर. (का प्र ) :-  चैत्र नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्री माता महाकाली यात्रेनिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा तसेच श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने भव्य भक्तिमय स्वर संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर आपल्या सुमधुर आवाजातून भक्तिरसाचा वर्षाव करणार आहेत. हा कार्यक्रम उद्या शुक्रवार, दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता मह्कली यात्रा परिसरात संपन्न होणार आहे.   शहनाज अख्तर यांचे हे खास सादरीकरण भाविकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. कार्यक्रमासाठी संपूर्ण परिसर आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला असून, महाकाली मातेचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. शहनाज अख्तर यांनी याआधीही अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांतून आपली खास ओळख निर्माण केली आहे, आणि त्यांच्या सादरीकरणाने भाविक मंत्रमुग्ध होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.मातेच्या भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                        *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here