Home
Home चंद्रपूर आयोजन समिती पदाधिकारी/संयोजक व शांतता समिती सदस्यांची बैठक संपन्न.

आयोजन समिती पदाधिकारी/संयोजक व शांतता समिती सदस्यांची बैठक संपन्न.

0
80

=============================

                         चंद्रपूर

               हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर(का.प्र.): पोलीस ठाणे चंद्रपूर शहर अंतर्गत आज दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 18/00 ते 19/15 वाजता पर्यंत पोलीस ठाणे चंद्रपूर कार्यक्षेत्रातील महात्मा फुले जयंती, हनुमान जन्मोत्सव , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संबंधाने विविध संस्था संघटना मंडळाचे वतीने आयोजित स्थानिक पूजा पाठ मिरवणूक प्रबोधन कार्यक्रम इत्यादी चे आयोजक, अध्यक्ष, सदस्य तथा डीजे चालक-मालक व शांतता समिती सदस्य यांची बैठक घेण्यात आली .या बैठकीत पूजा अर्चना, मिरवणूक रॅली असल्यास वाहतूक नियमाचे, सर्वोच्च न्यायालयाचे सूचना व निर्देशानुसार ध्वनिक्षेपक मर्यादा चे पालन करावे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये या बाबत तसेच वरिष्ठांकडून आलेले मार्गदर्शक सूचनाचे पालन पालन करण्याबाबत चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्याकडून

सूचना देण्यात आल्या.

महाप्रसादाचे कार्यक्रम असल्यास त्याबाबत अन्न उष्णतेमुळे खराब होणार नाही त्यामुळे विषबाधा होणार नाही या दृष्टीने काळजी घेण्यात व अन्न औषध प्रशासननाकडून वितरित करण्यात येणारे खाद्यान्न तपासणी करून घेण्याबाबतही आयोजकांना सूचना देण्यात आल्यात
सदर बैठकीमध्ये शांतता समिती सदस्य डीजे चालक – मालक तसेच उत्सव संयोजक समितीचे पदाधिकारी शांतता समिती सदस्य या बैठकीत उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक
पोलीस ठाणे चंद्रपूर शहर चे पोलिस निरीक्षक प्रभावती यांच्या नेतृत्वाखाली
ही बैठक घेण्यात आली.

आगामी १२ एप्रिल २०२५ रोजी
संपन्न होत असलेल्या श्री. हनुमान जन्मोत्सव तसेच दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी संपन्न होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव या निमित्य जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून
पोलीस ठाणे चंद्रपूर शहर येथे सलोखा बैठक आयोजित करण्यात आली होती.सदर उत्सव शांततेत व जातीय सलोखा कायम ठेवून संपन्न होण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे अशी विनंती देखील या बैठकीत प्रभावती एकुरके यांनी केली. चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी ही बैठक चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात घेतली असून त्यांनी सांगितले की सोशल मीडियावर कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट आपल्याला दिसून आल्यास किंवा कोणतीही दिशाभूल करणारी बातमी आपल्या कानावर आल्यास त्याची खात्री करून आवश्यक असल्यास पोलीस स्टेशन येथे संपर्क करावे ते मेसेज किंवा बातमी परस्पर फॉरवर्ड करू नये. आगामी सण उत्सवात सर्वांनी परवानगी घेऊनच कार्यक्रम पार पाडावे जेणेकरून कायदा व सुव्यवस्था बाधित होणार नाही व जातीय सलोखा सुद्धा कायम राहील. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे व सण उत्सवाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बैठकीत मिळालेल्या सूचनेप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुद्धा कॅम्प लावण्यात येईल व ॲम्बुलन्स ची व्यवस्था देखील व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल असे देखील पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी सांगितले.चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली यांनी सांगितले की आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्व उपासक – उपासिकांना योग्य त्या सुविधा मनपा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात याव्या विशेषतः दोन फिरते शौचालय आंबेडकर चौक समोरील श्री टाकीज चौक येथे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे. तसेच उन्हाचा तडाका वाढल्याने सर्व बंधू भगिनींनी आपल्या सोबत स्वतःचे पाणी किंवा शक्य असल्यास ओ.आर.एस. सोबत ठेवावे अशा सूचना केल्या.

जिल्हा शांतता समितीचे सदस्य बाळू खोब्रागडे यांनी 14 एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची इत्यंभूत माहिती दिली.

चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सदानंद खत्री यांनी सांगितले की सध्या सोशल मीडियाचा काळ सुरू असल्याने आपण अफवा पसरणाऱ्या बातम्याना थारा देऊ नये आपणाकडे आक्षेपार्ह कोणतीही बातमी किंवा मेसेज आल्यास त्याला तिथेच डिलीट करून वातावरण दूषित होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगितले.

या बैठकीत अनेक मान्यवरांनी आपल्या सूचना मांडल्या चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, बाळू खोब्रागडे, सदानंद खत्री, शालिनी भगत, शहर शांतता समिति सदस्य दर्शन बुरडकर, आसिफ पठाण, मोरेश्वर खैरे, श्रीमती रेखा धनंजय दानव, गुलाबराव पंडित पाटील, हरिदास नागपुरे, विजय करमरकर, छायाताई थोरात, अमित खोब्रागडे, सिद्धांत मुळे, कृतीक खोब्रागडे, रनिश दुधे, अभिजीत गलबले, प्रफुल ऊके, सुजल कासवटे, हनुमान चांदेकर, राजकुमार वनकर, संजय टोंगे, सचिन दुधे, प्रेरणा करमरकर, मंगेश दुधे, शुभम बारसागडे, विपिन लभाने, संजय कासवटे, गोवर्धन डोंगरे, प्रशांत भोंगळे, विशाल कवाडे, किशोर रामटेके, दिलीप डांगे, श्रेयस मून, सिद्धार्थ वाघमारे, श्याम साखरकर, स्वाती थिटे,रुपेश वासनिक विशेष शाखेचे सुजित बंडीवार सह अनेक मान्यवरांची या बैठकीत उपस्थिती होती.   =============================*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   =====================   *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here