Home
Home Breaking News आ. किशोर जोरगेवार यांच्या मागणीनंतर पोलिस महासंचालकांचे पत्र पोलिस अधीक्षक कार्यालयात धडकले

आ. किशोर जोरगेवार यांच्या मागणीनंतर पोलिस महासंचालकांचे पत्र पोलिस अधीक्षक कार्यालयात धडकले

0
87

============================

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सायबर घोटाळ्याची होणार फॉरेन्सिक चौकशी

                            चंद्रपूर

                     हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर.(का प्र) :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल २.९३ कोटींचा सायबर घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतरया प्रकरणाची तातडीने फॉरेन्सिक चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. याबबत त्यांनी पोलिस महासंचालकांना निवेदन सादर केले होते. या मागणीची दखल घेत पोलीस महासंचालकांनी तातडीने जिल्हा पोलिस अधीक्षकांना या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

दिनांक ७ ते १० फेब्रुवारी २०२५ दरम्यान चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सायबर हल्ल्यातील गैरव्यवहारामुळे एकूण ₹३.६० कोटींच्या व्यवहारात आर्थिक घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात केवळ ₹९० लाखांची रक्कम परत मिळवण्यात पोलिसांना यश आले असूनउर्वरित २.९३ कोटींची रक्कम अद्यापही गहाळ आहे. यामध्ये बँकेचे अध्यक्षमुख्य कार्यकारी अधिकारीआयटी विभागप्रमुखसंगणक सहाय्यक तसेच सायबर सिक्युरिटी पुरवठादार यांच्या संगनमताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

विशेष म्हणजेबँकेने सायबर सुरक्षिततेसाठी तब्बल १०० कोटींचा खर्च दाखवूनही कोणतीही ठोस सुरक्षित व्यवस्था न ठेवताविमा संरक्षणही घेतलेले नव्हते. इतकेच नव्हेतर न्यायालयीन परवानगी न घेता ग्राहकांची रक्कम नफ्यातून परत करून बँकेने न्यायप्रक्रिया चाही अवमान केला आहे.

बँकेच्या आंतरर्गत समितीने तयार केलेला फॉरेन्सिक अहवाल अपुरा व दिशाभूल करणारा असल्यानेत्याची पुनर्तपासणी स्वतंत्र तज्ज्ञांमार्फत करण्यात यावीअशीही मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. या प्रकरणातील सर्वांगीण चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमण्यात यावेदोषींवर तातडीने कारवाई व्हावीअशीही त्यांनी मागणी केली आहे. या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत पोलिस महासंचालकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना त्वरित चौकशी करून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची लवकरच सखोल चौकशी होणार असूनदोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                        *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here