Home
Home चंद्रपूर अम्मा की छाया सामाजिक सभागृह आईच्या मायेचा स्पर्श देणारी ग्रामविकासाची नवी वाट...

अम्मा की छाया सामाजिक सभागृह आईच्या मायेचा स्पर्श देणारी ग्रामविकासाची नवी वाट ठरेल – आ. किशोर जोरगेवार.

0
74

वेंडली येथे अम्मा की छाया – सावली मायेची उपक्रमांतर्गत तयार होत असलेल्या समाज भवनाचे भूमिपूजन.

चंद्रपूर

हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर.(का प्र) :- आजचा हा दिवस फक्त एक भूमिपूजन नाहीतर आपल्या गावात आईच्या मायेचा स्पर्श घेऊन नव्या वाटेवर पडलेलं एक पाऊल आहे. अम्मा की छायासावली मायेची हे नाव उच्चारताच एक मायेची छाया मनात दरवळते. गावाचा खरा विकास रस्त्यांनी किंवा इमारतींनी होत नाहीतर तो संस्कारांमधूनसमविचारातून आणि एकत्र येण्याच्या जागांमधून होत असतो. त्यामुळे येथे साकार होत असलेले अम्मा की छाया समाज भवन आईच्या मायेचा स्पर्श देणारी ग्रामविकासाची नवी वाट ठरेलअसे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

ग्रामविकास निधीतून मायेची सावली उपक्रमांतर्गत वेंडली येथे मंजूर सामाजिक सभागृहाच्या कामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारभारतीय जनता पार्टीचे नेते प्रकाश देवतळेनामदेव डाहुले, सरपंच प्रतिमा अलवलवारप्रकाश अलवलवारमाजी सरपंच कैलास चिवंडेआशिष माशिरकरआनंदराव पिंपळशेंडेपोलिस पाटील संजय पाटीलविनोद खेवलेश्रीरंगपाटील वरारकरमेश्राम आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कीसामाजिक सभागृह म्हणजे केवळ भिंती नाहीतही आपल्या संस्कृतीचीआपुलकीची आणि एकतेची वास्तू आहे. या जागेवरून अनेक माऊल्यांचे आशीर्वाद पसरतीलइथे मुलांना शिकण्यासाठी आधार मिळेलमहिलांना आत्मनिर्भरतेची दिशा सापडेलतर युवक-युवतींना आपली कलाक्रीडा आणि विचार व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. या जागेचा उपयोग समाज घडवण्यासाठी व्हावानात्यांना जोडण्यासाठी व्हावा आणि पुढच्या पिढ्यांना नवा विचार देण्यासाठी व्हावा.

या भवनामध्ये सामाजिकसांस्कृतिकशैक्षणिक आणि क्रीडा उपक्रमांचे आयोजन करता येईल. स्थानिक युवक-युवतींनाकलाकारांना आणि नागरिकांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी एक भक्कम मंच मिळेल. संघटनसमता आणि संस्कृतीचे मूल्य जपणारे हे केंद्र भविष्यात गावाच्या सर्वांगीण विकासाचे प्रतीक ठरेल. हा उपक्रम समाजाला एकत्र बांधणाराप्रेरणा देणारा आणि नवचैतन्य निर्माण करणारा ठरेलअसा विश्वास यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. यावेळी येथीलच सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या समाज भवनाचेही आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                    *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*सहसंपादक:- राजेश मेश्राम*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here