Home
Home चंद्रपूर जागतिक पातळीवर लोककलांच्या वाटयाला दुर्दैवी वास्तव येतं.

जागतिक पातळीवर लोककलांच्या वाटयाला दुर्दैवी वास्तव येतं.

0
134

डॉ.खानोरकरांच्या ‘ संजोरी ‘ ग्रंथाचे प्रकाशन : प्रा.सुरेश द्वादशीवारांचे प्रतिपादन.

                                  चंद्रपूर 

                           हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर.(का प्र) :- ” रशियातील लोकनृत्य पाहायला रशियन नसतात,बाहेरचे पर्यटक असतात.मी नंदुरबार पासून देश, विदेशातील गडचिरोलीच्या सिरोंच्यापर्यंतचे आदिवासी पाहिले.ते गरिब,दरिद्री, कष्टकरी आहेत पण ते दुःखी, खिन्न,निराश नाहित.त्यांच्या पोरांच्या तोंडावर माशा बसतात पण ते हसतात. चांगले लेख प्रा.खानोरकरांनी ‘ संजोरी’त लिहलेत अन् ते खास विनोदी शैलीत.’संजोरी ‘ म्हणजे धानचुरन्याचे खळयावरील शेवटच्या मोळयाचे मटनाचे जेवन.या देशातले ८४ टक्के हिंदू मांसाहारी आहेत.’ संजोरी ‘ याही दृष्टीने महत्त्वाची आहे.जे इतिहास विसरतात त्याला भविष्य असत नाही.ग्रामीण, आदिवासी,झाडीपट्टीचे सौंदर्य ‘ संजोरी ‘त आहे.येथील ‘ झाडी माणसाची ‘मोह’माया ‘हा अत्यंत सुंदर लेख.कधीतरी संचिताकडे आपण लक्ष दिले पाहिजे,ते यांनी दिले.तिखट ही चव आहे.हिरोती हा त्याचा खरा शब्द आहे.संवाद हे साध्य आहे,भाषा माध्यम आहे,म्हणून संवाद व्हावा. ‘ संजोरी ‘पुस्तकात राहू नये ती लोकांच्या मनात जावी.आपण या लोककलांपासून दूर चाललो आहोत म्हणून जागतिक पातळीवर लोककलांच्या वाटयाला दुर्दैव येतं.” असे बहूमूल्य विवेचन ज्येष्ठ संपादक व प्रसिद्ध कादंबरीकार प्रा.सुरेश द्वादशीवारांनी केले.
ते डॉ.धनराज खानोरकर लिखित झाडी लोककला, लोकसंस्कृतीच्या ‘संजोरी’ ग्रंथ प्रकाशनानिमित्त श्रमिक पत्रकार संघ भवनात बोलत होते.’संजोरी’चे प्रकाशन त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रम चंद्रपूर जिल्हा झाडी बोली साहित्य मंडळाने आयोजित केला होता. विचारपिठावर भाष्यकार म्हणून नागपूरचे प्रसिद्ध लेखक व समीक्षक डॉ.प्रमोद मुनघाटे,डॉ.श्याम मोहरकर, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर व लेखक डॉ.धनराज खानोरकर,कवी अरुण झगडकर उपस्थित होते.यावेळी डॉ.मुनघाटे म्हणाले,” ‘संजोरी ‘हा प्राध्यापकांचा संशोधन पेपर नव्हे ते झाडीचे सांस्कृतिक संचित आहे.हे त्यांनी एक पुस्तकरुपाने दस्तऐवज म्हणून आपल्या सामोर आणलं आहे.झाडीच्या लोककलांबद्दलचा असा पुस्तक पहिल्यांदाच आला.ते यमक ,श्लेष वापरतात व स्वत:च नव्या म्हणींना जन्म देतात.हे प्रा.खानोरकरांचे काम बहुमूल्य असे आहे. “तर डॉ.मोहरकरांनी, डॉ खानोरकरांनी स्वतःची खास शैली घडवली असून बोलणं, लिहिणं,वागणं एका तालात आहे.’ संजोरी ‘ वाचतांना याची पानोपानी प्रचिती येते,असे विचार मांडले.
प्रास्ताविकातून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकरांनी झाडीबोलीचा इतिहास कथन केला. डाॅ.खानोरकरांनी ‘ संजोरी ‘ जन्माची कथा सांगीतली. संचालन चंद्रपूर झाडीबोली मंडळाचे अध्यक्ष कवी अरुण झगडकरांनी तर आभार कवी प्रशांत भंडारेंनी मानले. कार्यक्रमाला अनेक कवी, लेखक,विचारवंत श्रोते उपस्थित होते. 

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*सहसंपादक:- राजेश मेश्राम*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here