चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर(वि. प्र.): चंद्रपूर पोलीस अधीक्षक म्हणून नव्याने रुजू झालेले ईश्वर कातकडे यांनी पदभार सांभाळला आहे.
चंद्रपूर जिल्हा शांतता समितीच्या वतीने चंद्रपूर अपर पोलीस अधीक्षक पदाचे ईश्वर काकडे यांनी कार्यभार सांभाळल्याने त्यांचे स्वागत सत्कार केले आहे.
या स्वागत सत्कार प्रसंगी चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, सदानंद खत्री, प्रवीण उर्फ बाळू खोब्रागडे, प्रकाश शेंडे, प्रियदर्शी मेश्राम, गुलाब पंडित पाटील, श्रीनिवास जंगमवार, इबादुल सिद्दिकी, दर्शन बुरडकर, मोरेश्वर खैरे,महादेव कांबळे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
साप्ताहिक कलम मागे इन्साफ चे मुख्य संपादक सय्यद रमजान अली यांनीही कलम मागे इंसाफ मित्र परिवारातर्फे चंद्रपूरचे अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे स्वागत केले व त्यांना पुढील भविष्याकरिता हार्दिक शुभेच्छा दिल्या!























