Home चंद्रपूर आगामी ईद ए मिलाद तसेच मुख्य गणेश विसर्जनच्या दिवशी 5 व 6...
चंद्रपूर
हॅलो चांदा न्यूज
चंद्रपूर(का.प्र.): चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक 5 रोजी ईद ए मिलाद व 6 रोजी गणेश विसर्जन कार्यक्रम पार पडणार आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा तसेच जातीय सलोखा कायम राहावा या उदात्त दृष्टिकोनातून दोन दिवस दारू विक्री बंद करण्यात यावी अर्थात दोन दिवस संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात ड्राय डे म्हणून घोषणा करण्यात यावी.अशी मागणी विदर्भ संपादक पत्रकार बहुउद्देशीय संस्था चे संस्थापक/अध्यक्ष सय्यद रमजान अली यांनी केली आहे.
वास्तविक पाहता एक दिवसाचा ड्राय डे घोषित जरी केला तरी दारू चे शौकिन हे एक दिवसापूर्वीच दारू खरेदी करून आपली सोय करून घेतात परंतु दोन दिवस सलग ड्रायडे ठेवल्यास किंवा घोषित केल्यास त्यांच्याजवळ दारू शिल्लक राहणार नाही किंवा साठवून ठेवता येणार नाही त्यामुळे ड्राय डे हा दोन दिवसाचा असल्यास त्यांना दारू उपलब्ध होणार नाही व संपूर्ण जिल्ह्यात शांतता कायम राहील हे ही मात्र तेवढेच खरे!
5 व 6 सप्टेंबर या दोन दिवसांत दारू विक्री होणार नाही या करिता संबंधित विभागाने हे प्रस्ताव दाखल करावे तसेच या प्रस्तावावर चंद्रपूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब करून 5 व 6 सप्टेंबर ला चंद्रपूर जिल्ह्यात ड्राय डे असणार अशी घोषणा करावी!अशी मागणी करण्यात आली आहे.
चंद्रपूर हा जिल्हा शांतताप्रिय असून या जिल्ह्याचा नावलौकिक कायम राहावा याकरिता ही मागणी करण्यात आली आहे, हे मात्र विशेष!
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*