Home चंद्रपूर अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या हस्ते झाले उद्घाटन!
आला हज़रत फाउंडेशनच्या वतीने आयोजित मोफत महाआरोग्य शिबिराचे अनेकांनी घेतले लाभ!
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर(का.प्र.): जश्ने ईद मिलादुन्नबी च्या पावन प्रसंगानिमित्त आला हज़रत फाउंडेशनच्या वतीने २ सप्टेंबर २०२५, मंगळवार रोजी सकाळी १२.०० ते दुपारी ५.०० वाजेपर्यंत मदरसा सीरतुल इस्लाम दादमहल वॉर्ड, कोहिनूर ग्राउंड जवळ चंद्रपूर येथे
मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूरचे अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या हस्ते संपन्न झाले या वेळी जामा मस्जिद चंद्रपूर चे इमाम दिलशाद रज़ा,कलम मांगे इन्साफ चे मुख्य संपादक सय्यद रमज़ान अली, माजी सभापति नंदू नागरकर, मरकजी सीरत कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद सादिक, युसुफ कुरेशी, मोहम्मद इकबाल सह डॉक्टर्स ची टीम व आला हज़रत फाउंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटनानंतर चंद्रपूरचे अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी आला हज़रत फाउंडेशनच्या या उपक्रमाची प्रशंसा करीत पुढे सांगितले की आपल्याला असे वाटते की आपण चांगलेच आहोत व आपली प्रकृती चांगलीच आहे, परंतु तपासणी शिवाय आपली तब्येत कशी आहे हे पूर्णपणे कळू शकत नाही. त्यामुळे आरोग्य तपासणी वेळोवेळी आपण केलीच पाहिजे व आपली प्रकृती आपण जपलीच पाहिजे असे सांगत त्यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे हे कार्यक्रम जनहितार्थ आहे व असे कार्यक्रम नेहमी होत राहिल्यास नागरिकांना मदत होईल असे देखील याप्रसंगी ईश्वर कातकडे यांनी सांगितले.

प्रमुख अतिथी चंद्रपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांनी ही या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला भेट दिली व अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
या महाआरोग्य शिबिराकरता मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर चे डॉक्टर्स सह स्थानिक डॉक्टर्स ही हजर होते.
यामध्ये मोहम्मद फैजान ( स्पाईन सर्जन), सुजान परवेज(रेडिओथेरपी) सोहेल काजी (न्यूरोसर्जन), समरीन सय्यद (डेंटिस्ट),सुषमा लीडर (बी एच एम एस) नेहा सोनारकर(बी एच एम एस) नोमान शेख(बी एच एम एस), अतुल सिंग(एमबीबीएस), डॉक्टर पोद्दार सह अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते.
या शिबिरात बीपी, रक्तातील साखर, थायरॉईड चाचणी, लिपिड प्रोफाइल, एलएफटी, केएफटी, सीबीसी, ईसीजी, मलेरिया, डेंग्यू या आजाराच्या संबंधात मोफत चाचण्या करण्यात आल्या व या
शिबिरात औषध ही मोफत उपलब्ध करुन देण्यात आली. या मोफत महाआरोग्य शिबिराचे लाभ ३५० ते ४०० नागरिकांनी घेतले.
या मोफत महाआरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन आला हज़रत फाउंडेशन च्या वतीने फाऊंडेशन चे अध्यक्ष मोहम्मद ओवेस शेख, उपाध्यक्ष मोहम्मद सोफेज कुरेशी, सचिव मोहम्मद मोइन कुरेशी, सहसचिव मोहम्मद अमान शेख, कोषाध्यक्ष सय्यद दानिश युसुफ कुरेशी, जाहिद शेख, सय्यद हुनैन, अदनान शेख वसीम शेख रेहान शेख जुनेद शेख शाहिद शेख आसिफ पठान शाहाबाद शेख वसीम शेख जुनेद शेख मिनाज शेख साद शेख, अलेन शेख, अमान शेख, अयान इकबाल, साहिल शेख,सह अनेक सदस्यांकडून करण्यात आले.
या मोफत महाआरोग्य शिबिर कार्यक्रमात उपस्थित झालेले सर्व मान्यवरांचे स्वागत शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन आला हजरत फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन हाजी गुलजार खान यांनी केले.
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*