Home
Home Breaking News वरोरा पोलीसांनी केला चोरीचा 3 तासात पर्दाफाश.

वरोरा पोलीसांनी केला चोरीचा 3 तासात पर्दाफाश.

0
115

HELLO CHANDA NEWS

               वरोरा,(वि. प्र.) : वरोरा येथे फीर्यादी नामे सुनील वासुदेवराव घाटे वय 45 वर्ष राह. हनुमान वार्ड वरोरा हे यात्रा वार्ड वरोरा चिकन मार्केट जवळ ते बँकेतुन काढलेले । लाख 40 हजार रुपये त्याचे मोपेड गाडीच्या डीकीत ठेवुन यात्रा वार्ड वरोरा येथे एका हॉटेल मध्ये गेले असता काही वेळातच त्याच्या मोपेड गाडी जवळ आले व त्याच्या डीकीतील नगदी रोख रक्कम । लाख 40 हजार रुपये कोणीतरी अज्ञात ईसमाने चोरी केली आहे.

                अश्या फीर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरुन पो. स्टे. वरोरा येथे अप क्र. 744/2025 कलम 303(2) भा.न्या.स.2023 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असता तात्काळ पो. स्टे. वरोरा तपास पथक प्रमुख सपोनी शरद एस भस्मे सा. सोबत संदिप मुळे, महेश गावतुरे, विशाल राजुरकर यांनी तात्काळ घटनास्थळ गाठुन परीसरातील सीसीटीव्ही कँमेरे चेक करुन अज्ञाद आरोपीचा शोध आरोपी नामे राजु लिगन्ना इंद्रपवार राह.

       यात्रा वार्ड वरोरा यास ताब्यात घेवुन गुन्हातील संपुर्ण रोख रक्कम 1,40,000/- रु आरोपीकडुन जप्त करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही. उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा
संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी अजिंक्य तांबडे सा.पो. स्टे. वरोरा यांनी तपास पथक सपोनी शरद भस्मे, पो. स्टॉफ संदिप मुळे, महेश गावतुरे, विशाल राजुरकर, अश्या टिमच्या विशेष मदतीने करण्यात आलेली आहे. तसेच व्यापारी वर्ग संजय शेडे, अनीकेत पुरी, प्रमोद लोंडे, जयंत ठमके यांच्या मदतीने करण्यात आलेली आहे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here