Home
Home Breaking News वरिष्ठांच्या मार्गदर्शनात…. नागभीड पोलीसांनी जंगल परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी मोहा हातभट्टी अड्डयावर टाकल्या...

वरिष्ठांच्या मार्गदर्शनात…. नागभीड पोलीसांनी जंगल परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी मोहा हातभट्टी अड्डयावर टाकल्या धाडी!

0
138

HELLO CHANDA NEES

          नागभीड(ता.प्र.): आज रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील पो.स्टे. नागभीड अंतर्गत कान्पा परीसरातील जंगलात अवैध मोहा हातभट्टी दारू अड्डुड्याबाबत गोपनिय माहीती काढुन नागभीड पोलीसांनी विशेष कारवाई केल्याने परिसरातील नागरिकांकडून गौरोद्गार काढले जात आहे, हे मात्र विशेष!

              पोलिस स्टेशन नागभीड परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी मोहा हातभट्टी अड्डयावर धाडी टाकल्या व फरार आरोपी 1) नामे आदित्य प्रदिप उके वय 26 वर्षे रा. कान्पा हा जंगलात हातभट्टी लावुन मोहा दारू गाळीत असताना त्याचे कडे मोहादारू 250 लिटर व मोहाफुल सडवा 1800 लिटर व साहीत्य असे एकुण किंमत 1,17,500/- रूपये चा मुद्देमाल मिळुन आला. 02) फरार आरोपी नामे रोहीत प्रकाश अलोने वय 27 वर्षे रा. कान्पा हा जंगलात हातभट्टी लावुन मोहा दारू गाळीत असताना त्याचे कडे मोहादारू 205 लिटर व मोहाफुल सडवा 1500 किलो व साहीत्य असे एकुण किंमत 99,600/-रूपये चा मुद्देमाल मिळुन आल्याने नमुद दोन्ही फरार आरोपी विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये कार्यवाही केली व सदर मोहादारू तसेच मोहासडवा नाशवंत असल्याने पंचासमक्ष एकुण 2,17,100/- रुपयेचा मुद्देमाल घटनास्थळीच नाश करण्यात आला.

                  सदरची कार्यवाही चंद्रपूर पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे ब्रम्हपुरी उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव , यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. नागभीड चे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांचे नेतृत्वात पो.उप.नि.अजिंक्य गोविंदलवार, पोलीस अंमलदार किशोर देशमुख, भरत घोळवे, ज्ञानेश्वर गिरडकर, विशाल पेंदाम, संदिप मडावी चालक पो.हवा. दामोदर करंबे यांचे पथकाने केल्याने परिसरातील नागरिकांकडून नागभीड पोलिसांच्या या कामगिरी चे कौतुक की जात आहे मात्र परिसरातील अवैध दारू विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे, हे मात्र विशेष!

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here