Home
Home चंद्रपूर जागतिक योगासन स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या डॉ. ज्योती देऊरकर यांचा आ.किशोर जोरगेवार यांच्या...

जागतिक योगासन स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या डॉ. ज्योती देऊरकर यांचा आ.किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार.

0
22

HELLO CHANDA NEWS

                   चंद्रपूर,(का. प्र.) : गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे आयोजित पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकावणार्या भद्रावतीच्या कन्या डॉ. ज्योती उर्फ पूजा देवराव देऊरकर यांचा रविवारी भारतीय जनता पक्षाच्या चंद्रपूर महानगर कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

                     यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री रविंद्र गुरनुले, श्याम कनकम, सविता दंढारे, स्मिता रेभनकर, शशिकांत मस्के, महेश गोरे आदिंची मंचावर उपस्थिती होती.

      ४ ते ८ जून दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत जगातील तब्बल ७८ देशांनी सहभाग नोंदविला होता. यात ३५ ते ४५ वयोगटातील ट्विस्टींग बॉडी इव्हेंटमध्ये डॉ. ज्योती देऊरकर यांनी सुवर्णपदक जिंकत भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर अभिमानाने फडकविला.

         या स्पर्धेत भारताने सांघिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले असून ओमान आणि जपान यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकाविले.

          यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, डॉ. ज्योती देऊरकर यांनी जागतिक स्तरावरील स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून केवळ चंद्रपूर जिल्ह्याचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचा गौरव वाढविला आहे. त्यांचे यश हे युवक-युवतींसाठी प्रेरणादायी असून कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्य यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.”

       ते पुढे म्हणाले की, “योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू यश मिळवत आहेत, ही अभिमानाची बाब आहे.

 डॉ. ज्योती देऊरकर यांच्यासारख्या खेळाडूंमुळे चंद्रपूरचे नाव जागतिक स्तरावर पोहोचत आहे.”

                         गेल्या दहा वर्षांपासून योगासन क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणार्या डॉ. ज्योती देऊरकर यांनी आतापर्यंत २० राष्ट्रीय सुवर्णपदके आणि ६ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके जिंकून आपल्या कर्तृत्वाची सुवर्णमुद्रा उमटविली आहे.

 या कामगिरी बदल आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी  भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here