Home चंद्रपूर बीएलओ अॅपमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करा. भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का. प्र.): चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील काही मतदान केंद्रांवर बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांच्या मोबाईल अॅपमध्ये डेटा मॅपिंग होत नसल्याने एसआयआर मोहिमेच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आ किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, बलराम डोडाणी, सुमित बेले, विश्वजित शाहा आदी उपस्थित होते.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, विधानसभा क्षेत्रातील काही मतदान केंद्रांवर बीएलओ मोबाईल अॅपमध्ये डेटा मॅपिंगची समस्या अनेक दिवसांपासून कायम आहे.
त्यामुळे संबंधित मतदान केंद्रांवरील मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण आणि पडताळणीचे काम रखडले आहे.
विशेषतः बूथ क्रमांक ७ व ८ (मोरेवा), बूथ क्रमांक २२९ व २३० (लालपेठ), बूथ क्रमांक ३१६ व ३२० (हनुमान नगर) तसेच बूथ क्रमांक ३७७ (नकोडा) येथे ही समस्या प्रकर्षाने जाणवत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असला तरी अद्याप तांत्रिक अडचणी दूर झालेल्या नाहीत. सध्या निवडणूक आयोगाच्या वतीने एसआयआर मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी डेटा मॅपिंगचे काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे संबंधित विभागाला आवश्यक निर्देश देऊन बीएलओ अॅपमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात, जेणेकरून मतदार यादी अद्ययावतीकरणाचे काम सुरळीतपणे पूर्ण होईल, अशी मागणी केली आहे.
यावेळी पक्षाच्या वतीने निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कामांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये आणि मतदारांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*