Home
Home चंद्रपूर समाजप्रबोधन करणारे चित्रपट ही काळाची गरज – आ. किशोर जोरगेवार.   तुफान...

समाजप्रबोधन करणारे चित्रपट ही काळाची गरज – आ. किशोर जोरगेवार.   तुफान एक नशा  चित्रपटाच्या प्रोमो स्क्रीनिंग सोहळ्याचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन.  

0
17

HELLO CHANDA NEWS

      चंद्रपूर,(का. प्र.)समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेच्या गंभीर समस्येवर भाष्य करणारा तुफान एक नशा हा चित्रपट चंद्रपूरच्या कलाकारांनी साकारला आहे.

    भारतीय जनता पक्षाच्या महानगर कार्यालयात या कलाकरांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सोबतच सदर चित्रपटाचे  प्रोमो स्क्रीनिंग करण्यात आले.

       यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, “मनोरंजनासोबतच समाजाला सकारात्मक दिशा देणारे आणि जनजागृती घडवून आणणारे चित्रपट ही आजच्या काळाची गरज आहे.

व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी कला आणि चित्रपट क्षेत्र प्रभावी माध्यम ठरू शकते.

  युवकांना योग्य संदेश देणार्या अशा आशयघन कलाकृतींमधून समाजपरिवर्तनाची चळवळ अधिक बळकट होईल.”

        ते पुढे म्हणाले की, “चंद्रपूरच्या कलाकारांनी स्थानिक पातळीवरून अशा महत्त्वाच्या विषयावर चित्रपट निर्मिती करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

 समाजातील वास्तव प्रश्नांवर प्रकाश टाकत जनजागृती करण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.”

              यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते चित्रपटाशी संबंधित कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि संपूर्ण टीमचा सत्कार करण्यात आला.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here