HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का. प्र.) पोलिस स्टेशन रामनगर येथे १६ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता चंद्रपूर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी मोहरम सणानिमित्त पोलिस स्टेशन रामनगरच्या पोलिस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
या बैठकीला चंद्रपूर जिल्हा शांतता समिती सदस्य सय्यद रमजान अली सह या बैठकीत मोहरम कमिटी पदाधिकारी/आयोजक सुभान पठाण, कृष्णा कुकडकर, निर्दोष देवतळे, सतीश चौधरी, कय्युम खा,किशोर येरमे, लाखन येरमे,सूरज चौधरी,सुनील शेडमाके,शेख वहिद बाबा,विजय जुमडे, रवी नवले,विशेषराव आत्राम, शाहीद अली,हाशिम अली मोहोद्दीन हुसेन, मो. काजिम विशेष शाखेचे एकनाथ सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी मोहरम उत्सवात कायदा सुव्यवस्था व जातीय सलोखा कायम रहावा म्हणून शासनाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करावे असे आवाहन याप्रसंगी पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी केले.
























