Home
Home Breaking News *वरोरा उपविभागीय पुलिस अधिकारी नयोमी साटम मैडम च्या मार्गदर्शना खाली वरोरा पोलिसांनी...

*वरोरा उपविभागीय पुलिस अधिकारी नयोमी साटम मैडम च्या मार्गदर्शना खाली वरोरा पोलिसांनी जबरी चोरी मध्ये सामील दोन चोरांना केले जेरबन्द*

0
179

=============================

पोलीस स्टेशन वरोरा येथे दि.०९/०६/२०२४ रोजी फिर्यादि कल्पना शिवराम चंदनखेडे, वय-४७वर्ष, रा. माढेळी ता. वरोरा यांनी जबानी रिपोर्ट दिली की, फिर्यादि हि तिचे घरी झोपली असतांना, दि.०९/०६/२०२४ चे ००.३० वाजता दोन अनोळखी इसमांनी तोंडाला रूमाल बांधुन फिर्यादिच्या घरात प्रवेश केला. व फिर्यादिकडुन कपाटाची चाबी घेउन, फिर्यादिचा गळा टॉवेलने दाबला. व फिर्यादिचा जिव घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे फिर्यादि बेशुध्द झाली. त्यानंतर काही वेळानी फिर्यादिस होश आला. तेव्हा फिर्यादिच्या कानातुन रक्त निघत होते. त्यानंतर फिर्यादिने तिचे घरातील लोखंडी कपाट उघडुन पाहीले असता, अनोळखी दोन इसमांनी कपाटातील १) १६०००रू. नगदि. २) एक सोन्याची अंगठी साडे तीन ग्रॅमची ३) दोन सोन्याच्या बिऱ्या पाच ग्रॅमच्या असा एकुण २५,००० रू.चा माल दोन अनोळखी इसमांनी फिर्यादिच्या घरात जबरीने प्रवेश करून, फिर्यादिचा जिव घेण्याच्या उद्देशाने टॉवेलने गळा दाबुन, जबरीने चोरून नेला. अश्या फिर्यादिच्या जबानी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन वरोरा येथे कलम-३९४,३९७,३४ भादवि प्रमाणे दि.०९/०६/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. वरील गुन्हयाच्या तपासा दरम्यान वरोरा येथील डि.बी. पथाकाने तपासा दरम्यान १२ तासांत दोन      ============================           आरोपीस ताब्यात घेउन, आरोपीकडुन पिसीआर दरम्यान, फिर्यादिकडुन जबरीने चोरलेले १) ९,५००रू  ============================               नगदि. २) एक सोन्याची अंगठी साडे तीन ग्रॅमची कि.अं-४०००रू. ३) दोन सोन्याच्या बिऱ्या पाच  ============================              ग्रॅमच्या कि.अं-५०००रू. ४) २४,५००रू किंमतीचे ०२ मोबाईल ५) गुन्हयात वापरलेली पल्सर मो.सा.  =============================  क्र.एम.एच.३४ सि.एच.३७०६ किं.अं-१,१८,००० रू.ची तसेच फिर्यादि नामे सुरेश पंढरीनाथ लोहकरे, रा.  ==============================          नागरी ता. वरोरा यांचे घरी झालेल्या घरफोडी संबंधाने पोस्टे वरोरा येथे दाखल अप.क्र.४८४/२०२४  ============================== कलम-४५४,४५७,३८० भादविच्या गुन्हयात, आरोपीने दि.०६/०५/२०२४ रोजी चोरलेल्या मालमत्ते  ==============================             पैकी ६) १० ग्रॅमची सोन्याची चैन कि.अं-५०,०००रू. ७) ०४ सोन्याचे मणी कि.अं-२०००रू.चे ३)  =============================       सोन्याच्या टॉपच्या साखळया ०१ ग्रॅमच्या कि.अं-५०००रू. असा एकुण ५७,००० रू. चे सोन्याचे दागिने,            ============================                    व पोस्टे. वरोरा अप.क्र.३९९/२४ कलम-४५४,३८० भादविच्या गुन्हयातील ग्राम माढेळी येथील सुनंदा  ==============================      गजानन घुबडे यांचे घरून चोरलेल्या रकमेपैकी ५०००रू. व पोस्टे वरोरा अप.क्र.२२०/२४ कलम- =======≈====================== ४५४,४५७,३८० भादविच्या गुन्हयातील ग्राम माढेळी वंदना हनुमान ढाले रा. माढेळी यांचे घरून चोरलेल्या  ==============================    रकमेपैकी ५०००रू. असा एकुण-०२,२८,००० रू.चा मुद्देमाल आरोपी नामे १) शुभम अशोक मंगेकर,  =============================          वय-२९ वर्ष, रा.माढेळी ता. वरोरा २) सुरज उर्फ अभय गजानन देवतळे, वय-२४वर्ष, रा.माढेळी ता.  ==============================           वरोरा यांच्या कडुन पि.सी.आर. दरम्यान जप्त करण्यात आला. व एक खुनाच्या प्रयत्नासहीत  ============================    जबरीचोरीचा गुन्हा व एकुण तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले.  ==============================           वरील कारवाई श्री मुमक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक चंद्रपुर, श्रीमती रिना जनबंधु, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, श्रीमती नयोमी साटम, सहायक पोलीस अधिक्षक, वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सहायक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे, पो.हेड.कॉ. दिपक दुधे, दिलीप सुर, पो.अं. मोहन निषाद, महेश गावतुरे, राजु लोधी, शशांक बादमवार, विशाल राजुरकर, संदिप मुळे, पोलीस स्टेशन वरोरा यांनी केली आहे.  =================================     *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================ 

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here