संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडने केले स्वागत शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी

0
32

संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य शिंपी समाज बांधवांच्या वतीने काढलेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाही शिंपी समाज बांधवांच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त्य शहरातुन शोभायात्रा काढण्यात आली. सदर शोभायात्रा यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयासमोर पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाचे वाटप करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सलिम शेख, सायली येरणे, नंदा पंधरे, आशा देशमुख, कल्पना शिंदे, अल्का मेश्राम, शम्मा काजी, माधुरी निवलकर, प्रमिला बावने, निलिमा वनकर, अनिता झाडे, वैशाली मेश्राम, विमल कातकर, वैशाली रामटेके, वैशाली मद्दीवार, कविता निखारे, चंद्रशेखर देशमुख, राम जंगम आदींची उपस्थिती होती.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here