* अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकार दिनी विनम्र अभिवादन *

0
70

_______________________________

चंद्रपूर- भद्रावती येथील कलाअकादमीमध्ये दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संपर्कप्रमुख शशिकांत मोकाशे, सिंधुताई सपकाळ यांच्यासोबत प्रदीर्घ अठरा वर्षापासून सेवाव्रत असलेले व भीमा कोरेगाव स्तंभाचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते दशरथ वाघमारे, महाराष्ट्र अंनिस वार्ता पत्राचे प्रतिनिधी सदस्य एन. रामटेके, महिला प्रतिनिधी शारदा खोब्रागडे, अनिता भजभुजे, लताताई टिपले, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे सदस्य गण प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशाची जांभेकर , स्त्री शिक्षणाच्या आद्य जनक सावित्रीबाई फुले, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत दीप प्रज्वलन करून पत्रकार दिन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रसंगी मान्यवरांनी आपले अनुभव कथन करीत काल- आज व उद्याची पत्रकारिता यावर विशेष मार्गदर्शन केले.

_________________________——-

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

———–—––——————————–

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here