*मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर होणार सक्त दंडात्मक कार्यवाही*

0
49

=============================

 *चंद्रपूर*

=========================

दिनांक २४,२५ रोजी होळी व धुलीवंदन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सदर उत्सवा दरम्यान मोठ्या प्रमाणात रंगाची उधळण होते. तसेच ठिकठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते. या कालावधीत काही अतिउत्साही तरुणमंडळी मद्य प्राशन करून दुचाकी/चारचाकी वाहने भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवितात. तसेच रोडने रंश (Rash) ड्रायव्हिग, स्टंटबाजी सारखे काय करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गंभिर अपघात घडुन जिवितहानी होत असते. त्याच्या अशा प्रकारच्या कृत्यावर आळा घालण्याचे दुष्टीने दिनांक २२ मार्च २०२४ ते दि.२५ मार्च २०२४ या कालावधीत संपुर्ण बंद्रपुर जिल्ह्यामध्ये ठिक ठिकाणी नाकेबंदी लावण्यात येणार आहे.

===========================

तरी सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की, कोणीही मद्य प्राशन करून वाहन चालविणार नाही. जर मा प्राशन करून वाहन चालवितांना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल यांची सर्वांनी नोंद घ्यावी. जिल्‌ह्यातील वाढते अपघात कमी करण्याकरीता वाहतुक नियंत्रण शाखा चंद्रपुर व जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह ची विशेष मोहीम घेवुन कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

=========================

‘तरी होळी व बुलीवंदन साजरा करतांना वाहन धारकांच्या चुकीमुळे निष्पाप नागरीकांचा बळी जावुन होळीच्या रंगाचा बेरंग होवु नये’ याकरीता वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. असे चंद्रपुर पोलीस विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here