Home
Home चंद्रपूर *शेतकऱ्यांच्या समृद्धीमध्येच देशाच्या प्रगतीचा मार्ग*

*शेतकऱ्यांच्या समृद्धीमध्येच देशाच्या प्रगतीचा मार्ग*

0
69

================================

*शेतकऱ्यांच्या समृद्धीमध्येच देशाच्या प्रगतीचा मार्ग*
*आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे कृषी महोत्सवात प्रतिपादन*
*धनोजे कुणबी समाजातर्फे कृषी महोत्सव व सरपंच मेळाव्याचे आयोजन*  ===============================

चंद्रपूर – मातीची सेवा करणारा धनोजे कुणबी समाज आहे. हा समाज सदैव शेतकऱ्यांसाठी कार्य करत असतो. आता शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचविण्याची आवश्यकता आहे. मी महाराष्ट्राच्या जाहीरनामा समितीचा अध्यक्ष झालो, तेंव्हा त्यात ‘मिशन जय किसान’चा समावेश केला. शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल होणार नाही, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील रयतेचं राज्य प्रस्थापित होऊ शकत नाही. कारण शेतकऱ्यांच्या समृद्धीमध्येच देशाच्या प्रगतीचा मार्ग आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.                                धनोजे कुणबी समाज मध्यवर्ती समिती, पुरस्कृत धनोजे कुणबी समाज मंदिर, लक्ष्मीनगर, चंद्रपूर द्वारा आयोजित भव्य कृषी महोत्सव सोबतच सरपंच मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित या कार्यक्रमाला आमदार देवराव भोंगळे,आमदार करण देवतळे, धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते, सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र कराळे, कृषी महोत्सव समितीचे प्रमुख श्रीधर मालेकर, भाजप महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, मनोहरराव पाऊणकर, विनोद पिंपळशेंडे, संदीप वायाळ, नरेंद्र जिवतोडे, देवानंद वाढई, प्रदीप महाकुलकर, नंदकिशोर वाढई, सुरेश ठिकरे, देवाभाऊ पाचभाई, अनिल डहाके तसेच समाजातील सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे देखणे आयोजन केल्याबद्दल श्री. सातपुते व त्यांच्या चमूचे कौतुक आ. श्री. मुनगंटीवार यांनी केले.तसेच सरपंच हा गावचा मुख्यमंत्री असून त्यांचे मान धन वाढ विन्या साथी प्रयत्न करण्याची ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी केली                            ================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ==============================              कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे

*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here