Home
Home चंद्रपूर *आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवारच्या वतीने निशुल्क चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन*

*आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवारच्या वतीने निशुल्क चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन*

0
73

==================================

*आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवारच्या वतीने निशुल्क चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन*

३०० नागरिकांना मोफत चष्मे वाटप

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरात डोळे तपासणी केलेल्या नागरिकांना आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते निशुल्क चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी जवळपास 300 नागरिकांना लाभ घेतला. आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवाराच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.                                                                              आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, माजी नगरसेविका शिला चव्हाण, माया उईके, कल्पना शिंदे, राशिद हुसेन, सुमित बेले, पंकज बेले, नकुल वासमवार, विश्वजित शहा आदींची प्रमुख उपस्थिती होती.      17 डिसेंबरला भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तुकुम येथेही आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिर आणि डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास 500 हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात शेकडो युवकांनी रक्तदान केले.   ===============================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*      ==============================                कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे

*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here